इमेज
  महेश नवमी निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ६१ जणांची आरोग्य तपासणी; ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान परळी वैजनाथ | प्रतिनिधी       महेश नवमी २०२६ निमित्त स्व. कौसल्याबाई गोविंदलालजी नावंदर यांच्या स्मरणार्थ परळी माहेश्वरी महिला संघटना आणि परळी तालुका माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ८० रक्तदात्यांनी  रक्तदान केले.      या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सीबीसी, एचबीए1, आणि लिक्विड प्रोफाईल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. एकूण ६१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला , तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले....

आता पुन्हा एका बांधकाम कामगाराला जनतेने बनवले नगरसेवक !

बांधकाम कामगारांना 'राजकीय बरकत' देणारे बरकतनगर: मिस्त्री काम करणाऱ्यांनाच इथे मिळते संधी !

मिस्त्री काम करणारे आयुब पठाण नेता बनले :आता पुन्हा एका बांधकाम कामगाराला जनतेने बनवले नगरसेवक !

परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....

       लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते याचे अत्यंत  अधोरेखित करणारे चित्र परळीत बघायला मिळाले. नगर परिषदेची निवडणूक ही स्थानिक नेते बनवणारी निवडणूक असते. या निवडणुकीतूनच त्या- त्या भागातून पुढचे नेते तयार होत असतात. परळी शहरातील बरकतनगर हा सामन्यांतून  राजकीय नेतृत्व उदयाला आणणारा भाग ठरला आहे. विशेष म्हणजे बांधकाम कामगारांना 'राजकीय बरकत' देणारे बरकतनगर अशी आता या भागाची ओळख होऊ लागली आहे. परळीचे उपनगराध्यक्ष राहिलेले, दोन वेळा नगरसेवकपदी विराजमान राहिलेले विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयुब खान पठाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरपालिका निवडणुकीपासून केली. तत्पूर्वी ते सुद्धा एक बांधकाम कामगार 'मिस्त्री' म्हणून काम करणारे होते. या निवडणुकीतही पुन्हा एकदा एका बांधकाम कामगारालाच नगरसेवक बनण्याची संधी या भागातील मतदारांनी दिली आहे.

         परळी वैजनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन अ मधून काँग्रेसचे उमेदवार फारूक गणी सय्यद उर्फ बब्बू यांनी इतिहास रचला आहे. काँग्रेसने परळीच्या निवडणुकीत सोळा उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र त्यापैकी केवळ बब्बू हेच विजयी झाले. विशेष म्हणजे केवळ 33 वर्ष वयाचे फारूक गणी सय्यद हे अतिशय सामान्य कार्यकर्ते व  बांधकाम कामगार म्हणून फरशीची मिस्त्री कामे करणारे एक कामगार आहेत. फारुख गणी सय्यद उर्फ बब्बू यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा ठरला आहे.व्यवसायाने मिस्त्री च्या हाताखाली काम करणारा बांधकाम कामगार असणारा हा युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरला. प्रतिस्पर्ध्यांकडे गाड्या, घोड्या पैशांचे प्रचंड बळ व अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक असतानाही त्यांनी घराघरात जाऊन सर्वसामान्य माणसाचे मन जिंकले.त्यांच्या माध्यमातून  एक बांधकाम कामगार नगरसेवक झाला. काँग्रेसने उमेदवारी देताना सुरुवातीला या जागेवर काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता मात्र काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुरभाई यांनी बब्बू सारख्या साध्या युवकावर विश्वास दाखवला आणि त्यांना निवडणुकीत उतरवले. बब्बू यांना १२१६ मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवाराला 1144 मतावर समाधान मानावे लागले. केवळ 72 मतांच्या फरकाने बब्बू यांचा विजय झाला. त्यामुळे बरकत नगर भागातून पुन्हा एकदा एक बांधकाम कामगार नगरसेवक बनला आहे.

राजकीय कारकिर्दीपुर्वी माजी उपनगराध्यक्ष आयुब पठाणही होते मिस्त्री...

     प्रभाग क्रमांक तीन या प्रभागात मोठा भाग हा बरकतनगरचा येतो. त्यामुळे या प्रभागाची ओळख बरकतनगर वार्ड अशीच आहे. या प्रभागातून स्थानिक निवडणुकांमध्ये कामगार वर्गाला विशेषतः बांधकाम कामगारांना जनता राजकीय पाठबळ देत 'बरकत' मिळवून देते अशा प्रकारची एक अघोषित परंपरा व ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वी या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे आयुब खान पठाण हे या भागातून दोन वेळा नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत. त्याचबरोबर परळी नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदावर आयुब पठाण यांनी काम केलेले आहे. वेगवेगळे सभापती पद व उपनगराध्यक्ष पद यावर काम करणारे आयुब पठाण हे सर्वसामान्य, शांत, संयमी नेते म्हणून परळी शहरात आज ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून त्यांना नव्याने जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र आज एका प्रमुख पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून परळी शहराचा नेता बनलेल्या आयुब खान पठाण यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी ते सुद्धा एक बांधकाम कामगार मिस्त्री म्हणून परिचित होते. त्यावेळीही या प्रभागातील जनतेने आपला आशीर्वाद बांधकाम कामगाराच्या मागे उभा करत आयुब भाई पठाण यांना दोन वेळा निवडून दिलेले आहे. याचीच पुनरावृत्ती यावर्षीच्या निवडणुकीत झाल्याचे बघायला मिळत आहे. फारूक गणी सय्यद उर्फ बब्बू या तरुण बांधकाम कामगाराला नगरसेवक बनवत या प्रभागाने पुन्हा एकदा बांधकाम कामगारालाच राजकीय दृष्ट्या 'बरकत' दिल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या