हर्षद घुमरे शिष्यवृत्ती परीक्षा धारक तसेच राज्यस्तरीय विनर परीक्षेत विभागात प्रथम
पाटोदा | अमोल जोशी.
पाटोदा शहरातील नामांकित असलेल्या डायमंड कोचिंग क्लासेस, पाटोदा येथील विद्यार्थी हर्षद घुमरे याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक झाला असून विनर परीक्षेत विभागात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले आहे.
पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत हर्षद घुमरे याने अत्युत्कृष्ट कामगिरी करत एकूण 300 पैकी 252 गुण मिळवून आपली क्षमता सिद्ध केली आहे
तसेच राज्यस्तरीय विनर परीक्षेत संभाजीनगर विभागात प्रथम येऊन विभागावर त्याने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.
हर्षद घुमरे याने यशाचे श्रेय आपल्या कठोर परिश्रमाला, डायमंड कोचिंग क्लासेसच्या मार्गदर्शनाला व पालकांच्या पाठिंब्याला दिले आहे.
त्याच्या यशाबद्दल कोचिंग क्लासेसचे सर्व मार्गदर्शक शिक्षक व पालकांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-----------------------------------------------
Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_
Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_
Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा