महत्त्वपूर्ण मागणी.....

तीव्र थंडी! शाळेच्या वेळा बदलण्याची मनोहर मुंडे यांची जोरदार मागणी

परळी : परळीसह राज्यभरात वाढलेल्या तीव्र थंडीमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे सांगत शाळेचे वेळापत्रक तातडीने बदलण्याची मागणी बहुजन विकास मोर्चाचे शहराध्यक्ष मनोहरराव मुंडे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे रोखठोकपणे केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना पहाटेच उठून शाळेत जावे लागत आहे. सध्या शाळा सकाळी ७.५० वाजता भरत असल्याने लहान मुलांना आणि पालकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.


थंडीची तीव्रता लक्षात घेता शाळेची वेळ सकाळी ९ वाजता करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय थांबेल, अशी ठाम मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नोंदवली.सकाळच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांना उठवणाऱ्या पालकांच्याही अडचणी वाढल्याचेही मुंडे यांनी स्पष्टपणे नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!