इमेज
  महेश नवमी निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ६१ जणांची आरोग्य तपासणी; ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान परळी वैजनाथ | प्रतिनिधी       महेश नवमी २०२६ निमित्त स्व. कौसल्याबाई गोविंदलालजी नावंदर यांच्या स्मरणार्थ परळी माहेश्वरी महिला संघटना आणि परळी तालुका माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ८० रक्तदात्यांनी  रक्तदान केले.      या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सीबीसी, एचबीए1, आणि लिक्विड प्रोफाईल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. एकूण ६१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला , तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले....

 श्रीपतरायवाडी येथे गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना



अंबाजोगाई.....दि.18जानेवारी रोजी अंबाजोगाई येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातर्फे श्रीपतरायवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना वाण म्हणून गावरान वाणाचे बीज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंचक मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हल्ली गावरान भाज्या व‌ फळे दुर्लभ होत आहेत.आरोग्याच्या दृष्टीने गावरान भाजी व फळे महत्त्वाची आहेत.म्हणुन महिला महाविद्यालयांतील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातील विद्यार्थीनींनी श्रीपतरायवाडी या गावात देशी गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना करून हे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वापरावे या संबंधी जागृती करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मंचक मोरे यांनी गावरान बियाणे बॅंकेची स्थापना करण्याचा उद्देश सांगुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम अधिकारी प्रा.महेजबीन फारुकी यांनी शेतकऱ्यांचे स्वागत‌ करुन गावरान वाणाचे बियाणे आरोग्यासाठी कसे महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सुमनताई पवार या होत्या.तसेच श्री.राजेंद्र जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सौ.श्रीकन्या जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी बहुसंख्य शेतकरी व विद्यार्थींनींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या