जयंती उत्सवाचे अध्यक्ष सुनील मस्के यांची माहिती.
माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांना अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे निमंत्रण
जयंती उत्सवाचे अध्यक्ष सुनील मस्के यांची माहिती
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवानिमित्त साठे नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित सार्वजनिक जयंती महोत्सवासाठी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांना सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने अधिकृत निमंत्रण देण्यात आले.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत, प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंती धनंजय मुंडे यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांनी निमंत्रणाचा स्वीकार करत सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.या प्रसंगी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल मस्के, निवास मस्के, महादेव मस्के, संतोष मस्के, गुलाब शिरसागर, नागेश मस्के, ज्येष्ठ नेते हनुमंत गायकवाड, संपादक अभिमान मस्के, डॉ. माणिक कांबळे तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साठे नगर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समितीच्या वतीने देण्यात आली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा