पोस्ट्स

इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2
इमेज
  मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी १७ एप्रिलला बीडमध्ये मोर्चा; खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहीर पाठिंबा बीड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात न्याय्य हक्क मिळावेत या प्रमुख मागणीसाठी बीड येथे दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी भव्य मुस्लिम आरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला बजरंग मनोहर सोनवणे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला मोठे बळ मिळाले आहे. याबाबत सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या अधिकृत पत्रात सोनवणे यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत आवश्यक असून, ही मागणी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पत्रात पुढे त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील अनेक मागास व वंचित घटकांप्रमाणेच मुस्लिम समाजालाही समान संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक व घटनात्मक जबाबदारी आहे. शिक्षण, रोजगार व आर्थिक उन्नती या क्षेत्रात मुस्लिम समाज मागे राहिल्याचे वास्तव लक्षात घेता, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्...

मार्गदर्शक सूचना जारी

इमेज
  उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन मार्गदर्शक सूचना जारी बीड , दि;१५,(जिमाका ) प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा ,मुंबई यांनी दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल२०२६ या कालावधीत येलो अलर्ट (yellow Alert) जारी केला आहे . कालावधीमध्ये तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.  उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षेचे उपाययोजना तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.  बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी ...
इमेज
  महापुरुषांच्या विचारांचे प्रचारक निर्माण व्हावेत - नितीन सावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावेत - मुख्य अभियंता सुनील इंगळे परळी / प्रतिनिधी: परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव समारोपाचा कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून नितीन सावंत उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे हे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्याख्याते नितीन सावंत म्हणाले की, "आज प्रतिगामी शक्ती देशांतर्गत डोके वर काढत असताना, समतेचे पुरस्कार करणाऱ्या महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रचारक निर्माण होण्याची गरज आहे."तसेच, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यां...

दिव्यांग मुलींना किसान विकास पत्राचे वितरण

इमेज
कडक उन्हात ना. पंकजा मुंडे चार दिवस विदर्भ दौऱ्यावर ; शासकीय बैठका, लोकार्पण आदी भरगच्च कार्यक्रम पशूचिकित्सालयाचे केळझर येथे भूमीपूजन तर सेलडोह येथे लोकार्पण पशूपालकांचे नुकसान होणार नाही याची सरकार काळजी घेईल ; जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्यासाठी प्रयत्न पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत घेतली बैठक वर्धा, दि.१५ -- कडक उन्हामुळे एकीकडे अंगाची लाही लाही होत असताना अशा वातावरणात  राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे मात्र पशूपालकांसाठी सरसावल्या आहेत. आजपासून चार दिवस त्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्या वर्धा इथे होत्या. जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी पशुपालकांच्या गावाशेजारीच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात कायमस्वरुपी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणाऱ्या छावण्या लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.    जिल्हाधिकारी कार्यालयात पशुप...

तब्बल पंचवीस तास चालतो पालखी सोहळा

इमेज
  दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री.पापदंडेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात  परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)                 तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री. पापदंडेश्वराचा पालखी सोहळा बुधवारी (ता.१५) पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.         गेल्या दिडशे वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री. पापदंडेश्वराच्या पालखी सोहळ्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. गाढे पिंपळगाव येथे श्री.पापदंडेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन बुधवार (ता.०८) ते बुधवार (ता.१५) पर्यंत करण्यात आले होते. या कालावधीत तृप्ती पवार यांची शिव कथा दुपारी १ ते ५ दरम्यान आयोजन करण्यात आली होती. ज्ञानेश्वरी पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रम भजन,किर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाची सांगता वार्षिक पालखी सोहळ्याने करण्यात आली.मंगळवारी (ता.१४) रात्री बारा वाजता परंपरेने ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने या पालखी सोह...

दिव्यांग सहाय्यक पोर्टल मधील नोंदणी २१ तारखेपर्यंत सुरू राहणार - डॉ.संतोष मुंडे

इमेज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचे ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब पौळ रामेवाडी यांच्या हस्ते उद्घाटन  दिव्यांग सहाय्यक पोर्टल मधील नोंदणी २१ तारखेपर्यंत सुरू राहणार  - डॉ.संतोष मुंडे परळी(प्रतिनिधी):     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचे आज मौजे रामेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्री बाबासाहेब उत्तमराव पौळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.    याप्रसंगी प्रथम दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचे मुख्य आयोजक महाराष्ट्र दिव्यांग कल्याण अभियानाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे तसेच विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच भविष्यात मिळणाऱ्या भक्कम आर्थिक आधारासाठी या दिव्यांग सहायक पोर्टल  मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण अभियान...

सर्व स्तरातून अभिनंदन......!!!!

इमेज
  यश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सीबीएसई दहावीच्या पहिल्याच बॅचचा १०० टक्के निकाल  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-          ग्रामीण भागातील दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेचा CBSE बोर्डाचा 10वीच्या पहिल्या बॅचचा 100 टक्के निकाल लागलेला आहे.              दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत CBSE बोर्डाच्या दहावीच्या पहिल्याच बॅचमध्ये १०० टक्के निकालाची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे गोरगरीब व ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील असून, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निकाल लागला आहे. शाळेच्या या यशामुळे दिंद्रुड परिसरात शिक्षणाची नवी दिशा निर्माण झाली असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही ही का...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या