पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली :
सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित! पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून सोलापूरला निघालेल्या २२२२५ वंदे भारत एक्स्प्रेसला पुणे रेल्वे स्थानकात अपघात घडला. रेल्वेच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली रुळावरून घसरली. रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताच ही ट्रॉली स्थानकाच्या डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरली. संयंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देश - महत्वाचे म्हणजे, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समजते. पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत क्रॉसिंग अपग्रेड करण्याचे काम नियोजित आहे. त्याच दरम्यान हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे केवळ एक चाकच डायमंड क्रॉसिंगवर घसरले आहे. ती डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खरेतर, देशभरातील अशा सर्व नॉन स्टॅन्डर्ड डायमंड क्रॉसिंग बदलण्यात येत आहेत. दु...