पोस्ट्स

घातपाताचा दाट संशय:

इमेज
  सोनपेठ तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा परळीजवळ विहिरीत आढळला मृतदेह ! संशयास्पद मृत्यू; कंबरेला दगड बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला परळी वैजनाथ, प्रतिनिधी:         सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी परळी तालुक्यातील इंजेगाव - सोनपेठ रस्त्यावर कॅनॉलच्या पलीकडील निर्जन ठिकाणच्या एका विहिरीत आढळून आला. मृताच्या कंबरेला मोठे दगड बांधलेले असल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        महारुद्र व्यंकटराव शिंदे (वय २३) असे मृताचे नाव असून तो २३ एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. महारुद्रचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आधीच व्यक्त केला होता. दरम्यान, आज सकाळी इंजेगाव -सोनपेठ रस्त्यावर  कॅनॉल पलीकडे असलेल्या एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घातपाताचा दाट संशय:        परळी...

प्रादेशिक समतोल आणि संघटनात्मक पातळीवर काम करणारांना संधी....

इमेज
Vidhan Parishad: विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' आहेत 6 उमेदवार मुंबई: प्रतिनिधी... विधान परिषदेसाठी भाजपच्या सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधान परिषदेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. पण या सहा जणांना संधी मिळाली आहे.        विद्यमान आमदारां पैकी एकाला संधी देण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना मात्र संधी देण्यात आली आहे. त्यांच्याच जागेवर होत असलेल्या पोटनिवडणूकीसाठी त्या आता भाजपच्या उमेदवार असतील. बाकी पाच चेहरे हे नवीन आहेत. जुन्या चेहऱ्यांना संधी मिळाली नाही. भाजपने जाहीर केलेल्या नावांमध्ये माधवी नाईक यांचंही नाव असून ते अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. तर, संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून ज...

प्रासंगिक लेख>>>>>>✍️ प्रा.डॉ.सिद्धार्थ सत्यभामा आबाजी तायडे,पंचशील नगर, परळी वै.

इमेज
प्रबोधनाचा लोकस्वर: स्मृतिशेष आबाजीराव तायडे (अण्णा) महात्मा बुद्ध-शिवराय -फुले -शाहू - डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे क्रांतीदर्शी विचार व आंबेडकरी समाजप्रबोधनात्मक जाणिवांचे आशयसूत्र जनमानसात पोचवणारे लोकगायक तथा सेवानिवृत्त तंत्रज्ञ आमचे वडील स्मृतिशेष आबाजीराव तायडे (अण्णा) यांचा २९ एप्रिल स्मृती दिन. त्या निमित्ताने या समृद्ध पर्वाचा अर्थातच अण्णांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.... आपल्या देशात सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या मंडळींची मोठी परंपरा आहे. आपल्या परिवर्तनीय गायकीतून समाजमनाला जागृत करण्यासाठी १९६५ साली "समाज सुधारक गायन मंडळ"  स्थापन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आंगलगाव ता. जि. परभणी येथे लोकगायक स्मृतिशेष आबाजी मेसाजी तायडे, यादव कांबळे, ज्ञानोबा कांबळे, देविदास नाटकर, लिंबाजी मस्के, वामन कांबळे, हरिभाऊ कांबळे, रंगनाथ कांबळे, गंगाराम साबणे, शेषेराव साबणे, मूंजाजी कांबळे, पिराजी कांबळे, त्र्यंबक तायडे, लक्ष्मण तायडे, अशोक कांबळे, साहेबराव तायडे, या सर्व समविचारी उपासकांच्या साथीने ...

पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली :

इमेज
  सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित! पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून सोलापूरला निघालेल्या २२२२५ वंदे भारत एक्स्प्रेसला पुणे रेल्वे स्थानकात अपघात घडला. रेल्वेच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली रुळावरून घसरली. रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताच ही ट्रॉली स्थानकाच्या डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरली. संयंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देश - महत्वाचे म्हणजे, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समजते. पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत क्रॉसिंग अपग्रेड करण्याचे काम नियोजित आहे. त्याच दरम्यान हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे केवळ एक चाकच डायमंड क्रॉसिंगवर घसरले आहे. ती डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खरेतर, देशभरातील अशा सर्व नॉन स्टॅन्डर्ड डायमंड क्रॉसिंग बदलण्यात येत आहेत. दु...
इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ - डॉ. भरत मुंडे टोकवाडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया असे आवाहन डॉ. भरत मुंडे यांनी केले.        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोकवाडी येथे मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.यावेळी गावात मिरवणुक दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत  पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले.        यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणात डॉ. भरत मुंडे यांनी कविता सादर करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यावेळी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगास...
इमेज
बाबासाहेबांनी बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षणाचे शस्त्र दिले  - रानबा गायकवाड  कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून लावावी - प्रा.दासू वाघमारे  परळी प्रतिनिधी.     भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील उपेक्षित गावकुसाबाहेरच्या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षण कायद्याने शिक्षण सक्तीचे केले होते. परंतु बहुजनांना बाबासाहेबांनी दिलेले शिक्षणाचे हे शस्त्र हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. हा कुटील डाव बहुजन समाजाने हाणून पाडावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील इंजेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महामानव,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.      तालुक्यातील मौजे इंजेगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड तर रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे, मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. दासू वाघमारे, सरपंच अमोल कराड...

मार्गदर्शक सूचना जारी

इमेज
  उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन मार्गदर्शक सूचना जारी बीड , दि;  २६  ,(जिमाका ) उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षेचे उपाययोजना तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.  बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किंवा ...

खत आणि मोटार रिवांडिंगच्या दुकानाचे मोठे नुकसान

इमेज
मंगळावर पेठेतील पाच दुकाने जळून खाक खत आणि मोटार रिवांडिंगच्या दुकानाचे मोठे नुकसान केज :- केज शहरातील मंगळवार पेठेतील पाच दुकानांना आग लागून खत आणि बी बियाण्यांच्या दुकानासह मोटार रिवाइंडिंग, पशु खाद्य आणि हॉटेलसह इतर तीन दुकाने जळून नुकसान झाले आहे. दि ११:३० वाजता मंगळवार पेठ केज येथील अनिल अशोक सूर्यवंशी यांचे गजानन अग्रो एजन्सी कषी सेवा केंद्राला अचानक आग लागून दुकानातील कीटक नाशक, तन नाशक, विद्राव्य खते, लिंबोळी पेंड आणि दुकानातील फर्निचर असे मिळून १२ लाख रु. चे नुकसान झाले आहे. तसेच या आगीमुळे त्यांच्या शेजारी असलेले खंडेश्वर पशु खाद्य ट्रेडर्स, प्रकाश मुंडे यांचे मोटार व इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीचे दुकान आणि नारायण नेहरकर यांचे चहाच्या दुकानासह दत्ता देशमुख यांचे दत्तात्रय फोटो स्टुडिओला सुद्धा या आगीमुळे नुकसान पोहोचले आहे. मोटार दुरुस्ती, चहाचे हॉटेल आणि पशु खाद्याचे मोठे नुकसान झाले आहे..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....