घातपाताचा दाट संशय:

इमेज
  सोनपेठ तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा परळीजवळ विहिरीत आढळला मृतदेह ! संशयास्पद मृत्यू; कंबरेला दगड बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला परळी वैजनाथ, प्रतिनिधी:         सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी परळी तालुक्यातील इंजेगाव - सोनपेठ रस्त्यावर कॅनॉलच्या पलीकडील निर्जन ठिकाणच्या एका विहिरीत आढळून आला. मृताच्या कंबरेला मोठे दगड बांधलेले असल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        महारुद्र व्यंकटराव शिंदे (वय २३) असे मृताचे नाव असून तो २३ एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. महारुद्रचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आधीच व्यक्त केला होता. दरम्यान, आज सकाळी इंजेगाव -सोनपेठ रस्त्यावर  कॅनॉल पलीकडे असलेल्या एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घातपाताचा दाट संशय:        परळी...

प्रादेशिक समतोल आणि संघटनात्मक पातळीवर काम करणारांना संधी....

Vidhan Parishad: विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' आहेत 6 उमेदवार


मुंबई: प्रतिनिधी...

विधान परिषदेसाठी भाजपच्या सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधान परिषदेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. पण या सहा जणांना संधी मिळाली आहे. 

      विद्यमान आमदारां पैकी एकाला संधी देण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना मात्र संधी देण्यात आली आहे. त्यांच्याच जागेवर होत असलेल्या पोटनिवडणूकीसाठी त्या आता भाजपच्या उमेदवार असतील. बाकी पाच चेहरे हे नवीन आहेत. जुन्या चेहऱ्यांना संधी मिळाली नाही. भाजपने जाहीर केलेल्या नावांमध्ये माधवी नाईक यांचंही नाव असून ते अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. तर, संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरुन काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....