पोस्ट्स

इमेज
‘या’ तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.

दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा...

इमेज
परळीतील सर्व आस्थापना व व्यावसायिकांनी 'फायर ऑडिट' व अग्निसुरक्षेचे नियम पूर्ण करून घेणे बंधनकारक - मुख्याधिकारी दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         वाढत्या उन्हाळ्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, परळी नगर परिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या जीवित व वित्तीय सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व व्यावसायिक संकुले, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना तात्काळ 'फायर ऑडिट' (अग्निसुरक्षा परीक्षण) करून घेणे आता बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.          सध्या तापमानाचा पारा वाढल्याने शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून अग्निसुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठे मॉल, हॉटेल्स, औद्योगिक युनिट्स आणि सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांना फायर ऑडिटच्या कक्षेत...

तब्बल दीड तास चालली सभा; प्रदीर्घ चर्चा, अनेक सदस्यांच्या आयत्या वेळेच्या विषयांना नगराध्यक्षांनी दिली संधी...

इमेज
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा :परळीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानुमते अनेक महत्त्वाचे निर्णय ! नागापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प, पाणी पुरवठा, मुलभूत सुविधा, अग्निशमन आदी विषयांसंबधित निर्णयांवर सभागृहात शिक्कामोर्तब परळी वैजनाथ (प्रतिनिधी) —               नगर परिषद परळी वैजनाथची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या व विकासाभिमुख चर्चेच्या वातावरणात पार पडली. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी सर्वानुमते  घेण्यात आले. सभेत सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विधायक सूचना मांडल्या. नागापूर येथील न.प.च्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प, पाणी पुरवठा,मुलभूत सुविधा, अग्निशमन, सोमवारी मांस विक्री बंदी, सरस्वती नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सात सदस्यीय अभ्यास समिती,आवश्यक रस्त्यांसाठी भूसंपादन प्रस्ताव करणे,आवश्यक साधनसामुग्री व मनुष्यबळ आदी सर्वंकष विषयांवर सभागृहात साधकबाधक चर्चा, संवाद व सर्वसमावेशी सुचनांनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती नग...

आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...
इमेज
 1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण बीड, दि. 29 (जि. मा. का.) 1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे.               मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 01 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता होणार आहे.  या सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज एक बैठकीत आढावा घेतला.  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनचे शैलेश सूर्यवंशी आदींची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.             कार्यक्रम स्थळावरील व्यवस्था त्याचप्रमाणे इतर आयोजन याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्य ध्वजारोहण सकाळी 8.00 वाजता असल्...
इमेज
नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा ‘रामभरोसे’ : महादेव गंगणे पाटील परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रेसिन या कापड दुकानाला दि. २८ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. थर्मलची अग्निशमन गाडी लवकर आली पण नगरपरिषदेची गाडी वेळेवर पोहचू शकली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहर आणि परिसराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा मात्र पूर्णपणे कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात एखादी मोठी आग लागल्यास ती विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा नगर परिषदेकडे उपलब्ध असली, तरी ती केवळ नावापुरतीच उरली आहे. अनेकदा अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर सुरू होत नाहीत किंवा पाणी असूनही तांत्रिक बिघाडामुळे फवारे चालत नाहीत. वाहने जुनी झाली असून त्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. प्रशिक्षित अग्निशमन जवानांऐवजी कंत्राटी कामगारांवर ही यंत्रणा सुरू  आहे.प्रशासनाने तात्काळ नवीन आधुनिक अग्निशमन वाहने खरेदी करावीत, कायमस्वरूपी प्रशिक्षित जवान...

रेझिंन’ मॉल जळून खाक; ५०० मीटरवरूनही गाडी ४० मिनिटे उशिरा

इमेज
  परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बोजवारा! नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक; चौकशी व कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात बुधवारी (दि. २९) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ‘रेझिंन’ या कपड्यांच्या मॉलचा अक्षरशः राखरांगोळी झाला. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्राची गाडी तब्बल ४० ते ५० मिनिटे उशिराने पोहोचली. या गंभीर हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील गजबजलेल्या ‘रेजिन लेडीज वेअर’ या दालनात अचानक आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले, मात्र प्रतिसादात झालेल्या विलंबामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंत मॉलमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला होता. या निष्क्रियतेवर संतप्त प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस ...
इमेज
  मुकुंद पुजा साहित्य भांडार येथे नव्याने सुरू झालेल्या भारतीय डाक सेवा केंद्र टपाल बुकींगला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद   परळी वैद्यनाथ दि.(प्रतिनिधी) भारतीय डाक विभागाने नव्याने सुरू केलेल्या भारतीय डाक  सेवा केंद्र. परळी येथील प्रसिद्ध असलेले मुकुंद पूजा विधी साहित्य भांडार येथे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या ग्राहक डाक सेवा केंद्राच्या पहिल्या दिवशी परळी येथील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 108 टपाल बुकिंग करण्यात आली.        भारतीय डाक विभागाने पहिल्यांदाच अशा ग्राहक सेवा केंद्राला मान्यता दिली असून, मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथील मुकुंद पूजा साहित्य भांडार येथे संचालक मुकुंद गोपाळ आंधळे यांना या केंद्राची मान्यता देण्यात आली आहे.सोमवार दि.२७ एप्रिल रोजी मोहिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या टपाल बुकिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यास परळी येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या ग्राहक सेवा केंद्रावर स्पीड पोस्ट बुकिंग, पार्सल बुकिंग करून केली  जाते.मुकुंद पुजा  विधी साहित्य भांडार,न्युअरुणोद्य मार्केट,घरणीकर रोड,पर...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....