रेझिंन’ मॉल जळून खाक; ५०० मीटरवरूनही गाडी ४० मिनिटे उशिरा

 परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बोजवारा!

नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक; चौकशी व कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात बुधवारी (दि. २९) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ‘रेझिंन’ या कपड्यांच्या मॉलचा अक्षरशः राखरांगोळी झाला. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्राची गाडी तब्बल ४० ते ५० मिनिटे उशिराने पोहोचली. या गंभीर हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील गजबजलेल्या ‘रेजिन लेडीज वेअर’ या दालनात अचानक आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले, मात्र प्रतिसादात झालेल्या विलंबामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंत मॉलमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला होता. या निष्क्रियतेवर संतप्त प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन बागवाले यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला.

    बागवाले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम व तत्पर करण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास परळीकरांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...