आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....
मुकुंद पुजा साहित्य भांडार येथे नव्याने सुरू झालेल्या भारतीय डाक सेवा केंद्र टपाल बुकींगला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद
परळी वैद्यनाथ दि.(प्रतिनिधी) भारतीय डाक विभागाने नव्याने सुरू केलेल्या भारतीय डाक सेवा केंद्र. परळी येथील प्रसिद्ध असलेले मुकुंद पूजा विधी साहित्य भांडार येथे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या ग्राहक डाक सेवा केंद्राच्या पहिल्या दिवशी परळी येथील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 108 टपाल बुकिंग करण्यात आली.
भारतीय डाक विभागाने पहिल्यांदाच अशा ग्राहक सेवा केंद्राला मान्यता दिली असून, मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथील मुकुंद पूजा साहित्य भांडार येथे संचालक मुकुंद गोपाळ आंधळे यांना या केंद्राची मान्यता देण्यात आली आहे.सोमवार दि.२७ एप्रिल रोजी मोहिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या टपाल बुकिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यास परळी येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या ग्राहक सेवा केंद्रावर स्पीड पोस्ट बुकिंग, पार्सल बुकिंग करून केली जाते.मुकुंद पुजा विधी साहित्य भांडार,न्युअरुणोद्य मार्केट,घरणीकर रोड,परळी वैद्यनाथ येथे असलेल्या सेवा केंद्राच्या टपाल बुकिंग सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान मुकुंद गोपाळ आंधळे केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा