1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

बीड, दि. 29 (जि. मा. का.) 1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे. 

             मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 01 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता होणार आहे.  या सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज एक बैठकीत आढावा घेतला.

 जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनचे शैलेश सूर्यवंशी आदींची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. 

           कार्यक्रम स्थळावरील व्यवस्था त्याचप्रमाणे इतर आयोजन याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्य ध्वजारोहण सकाळी 8.00 वाजता असल्याने इतर कार्यालयाने सकाळी 7.15 वाजेपूर्वी ध्वजारोहण करणे किंवा मुख्य ध्वजारोहणानंतर 9.00 वाजेनंतर ध्वजारोहण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

मुख्य प्रशासकीय इमारत

          मुख्य प्रशासकीय इमारत येथील ध्वजारोहण सकाळी 6.45 वाजता अप्पर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांच्या हस्ते होणार आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालय

 जिल्हाधिकारी कार्यालय ध्वजारोहण सकाळी 7.10 वाजता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते होईल.

                                                      ******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...