आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...

नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा ‘रामभरोसे’ : महादेव गंगणे पाटील

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रेसिन या कापड दुकानाला दि. २८ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. थर्मलची अग्निशमन गाडी लवकर आली पण नगरपरिषदेची गाडी वेळेवर पोहचू शकली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहर आणि परिसराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा मात्र पूर्णपणे कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात एखादी मोठी आग लागल्यास ती विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा नगर परिषदेकडे उपलब्ध असली, तरी ती केवळ नावापुरतीच उरली आहे. अनेकदा अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर सुरू होत नाहीत किंवा पाणी असूनही तांत्रिक बिघाडामुळे फवारे चालत नाहीत. वाहने जुनी झाली असून त्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. प्रशिक्षित अग्निशमन जवानांऐवजी कंत्राटी कामगारांवर ही यंत्रणा सुरू  आहे.प्रशासनाने तात्काळ नवीन आधुनिक अग्निशमन वाहने खरेदी करावीत, कायमस्वरूपी प्रशिक्षित जवानांची नियुक्ती करावी आणि दर महिन्याला यंत्रणेची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट