पोस्ट्स

विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...
इमेज
  जादूटोणा व फसवणूक करणाऱ्या महिलेला बीड जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी तडीपार; उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश बीड येथील मोमीनपुरा पेठ भागातील नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या शेख नाजिया शेख पाशा या महिलेला बीड जिल्ह्यातून पुढील सहा महिन्यांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २० मे रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित महिलेवर २०१४ ते २०२४ या कालावधीत जादूटोणा करणे, नागरिकांची फसवणूक करणे यासारखे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्या क्रूर कृत्यांमुळे नागरिकांच्या मालमत्तेला व जीविताला धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. आदेशानुसार, या महिलेला दोन दिवसांच्या आत बीड जिल्ह्याची हद्द सोडण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सहा महिने दंडाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. हद्दपारीच्या काळात ती ज्या नवीन ठिकाणी राहील, तेथी...

पेठ बीड पोलिसांची मोठी कारवाई;

इमेज
  जनावरे चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड ३ लाख किमतीची स्कॉर्पिओ जप्त    बीड: पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोबा गल्ली येथून स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश जातीची जनावरे चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी सिनेमॅटिक पाठलाग करून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. दिनांक २३ मे २०२६ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, पोलिसांनी या टोळीतील तीन अट्टल चोरांना जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरलेले ३ लाख रुपये किमतीचे काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ तपास चक्र फिरवली होती.   तपास पथकाने बीड शहरातील ४० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक संशयित काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आढळून आली, मात्र तिचा नंबर प्लेट स्पष्ट नव्हता. पोलिसांनी तब्बल १९० किलोमीटरपर्यंतचे कॅमेरे आणि टोल नाके तपासले, तेव्हा आरोपींनी वारंवार नंबर प्लेट बदलून प्रवास केल्याचे समोर आले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पोलीस पथक मालेगाव आणि त्यानंतर सिल्लोड येथे पोहोचले. तेथे पळून जाण्याच्या तयारीत अ...
इमेज
  वादळी वाऱ्यामुळे हाहाकार; फळबागा उद्ध्वस्त, वीज यंत्रणा कोलमडल्याने अनेक गावे अंधारात! केज: तालुक्यातील युसुफ वडगाव मंडळ आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळसदृश वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. ताशी १०० ते १२५ किलोमीटरच्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची आणि युसुफवडगाव परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुख्य रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा आणि इतर फळबागा जमिनीदोस्त झाल्या असून नागरिकांच्या घरांवरील पत्रे तसेच घरगुती व कृषी सोलर पॅनेल्स हवेत उडून गेले आहेत. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वांत मोठा फटका परिसरातील सार्वजनिक वीज पुरवठा यंत्रणेला बसला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. उच्चदाब वीजवाहिन्य...
इमेज
  बीड जिल्ह्यातील पाच अट्टल गुंडांवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी बीड: बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी व वाळू माफियांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकाच दिवशी पाच सराईत गुंडांवर 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची धडक कारवाई करण्यात आली. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २२ मे २०२६ रोजी आदेश पारित करून या पाचही जणांना छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.   या कारवाईत केज येथील जुबरे ऊर्फ मारी फारोकी (१० गुन्हे), पेठ बीडचा मोमीन सलीम (६ गुन्हे) आणि नवगण राजुरी येथील तुकाराम लक्ष्मण पवार (८ गुन्हे) यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले व कारागृहात रवाना केले. यातील एक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दुसऱ्या फरार आरोपीच्या पोलीस मागावर आहे.   या गुन्हेगारांवर मारहाण, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे आणि अवैध दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात ...
इमेज
अवकाळी पाऊस व वीज: झाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू  केज: तालुक्यातील सोनी जवळा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि वीज कोसळल्याच्या भीषण घटनेत दिगंबर भीमराव ससाणे (रा. सोनी जवळा, ता. केज) या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.  शनिवारी, २३ मे रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास युसुफ वडगाव मंडळात अचानक कडाक्याच्या वादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी शेतात काम करत असताना वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ससाणे यांनी एका मोठ्या आंब्याच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याच आंब्याच्या झाडावर अचानक वीज कोसळली. विजेचा धक्का आणि वादळाचा प्रचंड वेग यामुळे हे झाड मुळासकट उखडले गेले. या झाडाखाली चिरडून ससाणे यांचा जागीच अंत झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे सोनी जवळा गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी आलेल्या या अनपेक्षित वादळाने युसुफ वडगाव परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून सगळीकडे हाहाकार माजवला आहे. निसर्गाच्या या रौद्ररूपामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे...

कुटुंबाचा आधार गेला.... कुटुंबावर दुःखाचा डोंगर

इमेज
  गंगाखेड - परळी रस्त्यावर निळा फाट्याजवळ अपघात; ऑटोचालक युवक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      गंगाखेड ते परळी रस्त्यावरील निळा फाट्याजवळ असलेल्या जिनिंग नजीक ऑटोचा भीषण अपघात होऊन ऑटोचालक युवक ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात आज (दि.२३) रोजी सायंकाळी 6:45 च्या सुमारास घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साळुंकवाडी ता. अंबाजोगाई येथील ऑटोचालक युवक परमेश्वर विठ्ठल कर्वे (वय 37) हे प्रवासी भाडे घेऊन गंगाखेडकडे गेले होते. गंगाखेडहुन परळी कडे परत येत असताना गंगाखेड -परळी रस्त्यावर निळा गावच्या फाट्यापासून काही अंतरावर या ऑटोची मोठ्या वाहनाला धडक झाली. या धडकेत ऑटो चे मोठे नुकसान झाले असून ऑटो चालक युवक परमेश्वर कर्वे गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी पडला होता. अपघात स्थळावरून परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात मृत्यू पावलेला ऑटो चालक युवक परमेश्वर कर्वे हा अतिशय सुस्वाभावी, मनमिळाऊ व सर्वपरिचित युवक होता. त्याच्या अपघाताची बातमी कळताच साळुंकवाडी व परळी परिसरात...
इमेज
  सराईत गुन्हेगारावर  एमपीडीए अंतर्गत कारवाई  केज :- केज येथील येथील सराईत गुन्हेगार जुबेर उर्फ मारी उर्फ पाप्या मुस्ताक फारोकी, वय (२९ वर्ष, रा. रोजा मोहल्ला, केज जि.बीड) याच्या विरुद्ध पोलिस प्रशासनाने संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत (एम पी डी ए ) अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे. केज शहरातील जुबेर उर्फ मारी ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी याच्यावर केज येथे घरात घुसुन मारहान करणे, हितसंबंधीत व्यक्तींना मारहाण करुन जबरीने पैसे काढुन घेणे, चोरी करणे, हत्याराने वार करुन जखमी करणे, दुखापत करणे, दगड विटाने मारुन जखमी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अवैध शस्त्र बाळगणे, मोटर सायकल चोरी इत्यादी अशा गंभीर स्वरूपाच्या दहा गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्या पैकी सहा गुन्हे हे न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून चार गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील आणि केज तालुक्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यातील गुंडगिरी, गुन्हेगारी तसेच वाळु माफीयांचे समुळ उ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या