विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी?

माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी

परळी | प्रतिनिधी

   धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.

   धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून दीपक देशमुख यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि जनसंपर्क यामुळे त्यांना कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

     दरम्यान, कार्यकर्त्यांमधून दीपक नाना देशमुख यांनी विधानपरिषद निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी होत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या निवडणुकीत नेमका काय निर्णय घेतो आणि उमेदवारी कोणाला मिळते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या