विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

अवकाळी पाऊस व वीज: झाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू 




केज: तालुक्यातील सोनी जवळा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि वीज कोसळल्याच्या भीषण घटनेत दिगंबर भीमराव ससाणे (रा. सोनी जवळा, ता. केज) या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. 


शनिवारी, २३ मे रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास युसुफ वडगाव मंडळात अचानक कडाक्याच्या वादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी शेतात काम करत असताना वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ससाणे यांनी एका मोठ्या आंब्याच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याच आंब्याच्या झाडावर अचानक वीज कोसळली. विजेचा धक्का आणि वादळाचा प्रचंड वेग यामुळे हे झाड मुळासकट उखडले गेले. या झाडाखाली चिरडून ससाणे यांचा जागीच अंत झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे सोनी जवळा गावावर शोककळा पसरली आहे.


शनिवारी सायंकाळी आलेल्या या अनपेक्षित वादळाने युसुफ वडगाव परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून सगळीकडे हाहाकार माजवला आहे. निसर्गाच्या या रौद्ररूपामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मृत दिगंबर ससाणे यांच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. एका बाजूला ससाणे यांचा शेतात मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या राहत्या घराच्या दारात असलेले चिंचेचे मोठे झाडही या वादळाने मुळासकट उपटून पडले. इतकेच नव्हे तर, त्यांनी शेतीसाठी नुकतेच नवीन वीज ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणले होते. मात्र, या निसर्गाच्या कोपामुळे ते नवीन ट्रान्सफॉर्मर आणि त्याचे सर्व विद्युत खांबही जमिनीवर कोसळून चक्काचूर झाले. परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकरी कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या