विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

पेठ बीड पोलिसांची मोठी कारवाई;

 जनावरे चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड


३ लाख किमतीची स्कॉर्पिओ जप्त  

बीड: पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोबा गल्ली येथून स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश जातीची जनावरे चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी सिनेमॅटिक पाठलाग करून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. दिनांक २३ मे २०२६ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, पोलिसांनी या टोळीतील तीन अट्टल चोरांना जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरलेले ३ लाख रुपये किमतीचे काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ तपास चक्र फिरवली होती.  

तपास पथकाने बीड शहरातील ४० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक संशयित काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आढळून आली, मात्र तिचा नंबर प्लेट स्पष्ट नव्हता. पोलिसांनी तब्बल १९० किलोमीटरपर्यंतचे कॅमेरे आणि टोल नाके तपासले, तेव्हा आरोपींनी वारंवार नंबर प्लेट बदलून प्रवास केल्याचे समोर आले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पोलीस पथक मालेगाव आणि त्यानंतर सिल्लोड येथे पोहोचले. तेथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या  आरोपींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.  

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख इम्रान शेख इसा (वय ३४, रा. सिल्लोड, सध्या रा. मालेगाव), शेख तय्यब शेख शफीक (वय ४०, रा. मोघलपुरा, सिल्लोड) आणि सलमान वहाब सय्यद (रा. बापुनगर, सिल्लोड) यांचा समावेश आहे. या टोळीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारचे जनावरे चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या