पोस्ट्स

इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
इमेज
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या  धारूर, प्रतिनिधी  धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  स्वाती मारुती देठे (वय १३, रा. आंबेवडगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास स्वाती हिने घरातील पत्र्याच्या लोखंडी अडूला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने धाव घेतली; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुलीचे वडील यांचे मागील दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते . दरम्यान, एवढ्या लहान वयात स्वातीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे
इमेज
तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सांत्वनपर भेट परळी | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते जीवनराव देशमुख, नगरपरिषद गटनेते नितीन बागवाले, नगरसेवक कादर कुरेशी, श्रीनिवास राऊत, बाबा शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच या दुःखद प्रसंगात कुटुंबीयांनी खंबीर राहावे, अशी भावना व्यक्त करत पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. या सांत्वनपर भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनीही उपस्थित राहून तोहीद पठाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. या भेटीमुळे कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्...

पोलिसांनी बनावाचे धागे उलघडले ,तिसरी आरोपी पत्नी

इमेज
अंजनवती अपघात प्रकरण : खुनाच्या कटात मयताची पत्नी सहभागी नेकनुर पोलिसांनी बनावाचे धागे उलघडले ,तिसरी आरोपी पत्नी  नेकनुर, प्रतिनिधी... नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अंजनवती येथील कामगार युवक अपघाताचा बनाव असलेल्या खुन प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचा संशय असलेल्या या प्रकरणात सखोल तपासादरम्यान हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी तळोजा पनवेल येथून ताब्यात घेतले यानंतर मात्र यातील काही धागे उलगडण्यात एपीआय मंगेश साळवे यांना यश आले असून आरोपी प्रियकराच्या मदतीने मयताच्या पत्नीचा खून करण्यात हात असल्याचे समोर आले आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंजनवती येथील कामगार युवक किरण बंडू सोनवणे याचा लिंबागणेश अंजनवती रस्त्यावर असलेल्या नाल्यात मृतदेह आढळून आला सुरुवातीला अपघाताचा बनाव दाखवण्यात आला मात्र गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने नेकनुर पोलिसांनी तपासाला गती देत तीन दिवसातच तळोजा ,पनवेल येथून या प्रकरणातील आरोपी दशरथ प...

खळबळजनक घटना......

इमेज
अनोळखी व्यक्तीचे विहिरीत सापडले प्रेत    दिंद्रुड :  तेलगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान सदरील प्रेताचे ओळख अद्याप ही पटली नसल्याने प्रेत अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवागारात ठेवण्यात आले आहे.सदरील प्रेता बाबत कुणाला ओळख पटली तर दिंद्रुड पोलीसांशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलीसांनी केले आहे.               यासंदर्भात पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,तेलगाव ता.धारूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरूषाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत विहिरीतील पाण्यात तरंगताना शेतकऱ्यास दिसुन आले.त्यावर संबंधित शेतकऱ्याने दिंद्रुड पोलीसांना याची माहिती दिली.त्यावर दिंद्रुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी परिसराची पाहणी करून विहिरीतील प्रेत पाहिले असता ते पालथे असल्याचे दिसून आले.स्थानिक शेतकरी व नागरिक यांच्या सहकार्याने पोलीसांनी प्रेत विहिरी बाहेर काढले.सदरील प्रेत हे गेल्या चार पाच दिवसांपासून विहिरीत असल्याचा अंदाज आहे.मयताच्या अंगावर पिवळ्या रंगाचे का...
इमेज
युवराज भास्करराव मुंडे यांना पीएचडी प्रदान परळी वैजनाथ (प्रतिनिधी)         युवराज भास्कर मुंडे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून  " वारकरी संप्रदायात वंजारी समाजातील संतांचे  योगदान : एक ऐतिहासिक अभ्यास " हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी चे प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले हे त्यांचे मार्गदर्शक होते. इतिहास विषयात प्राध्यापक पदासाठीची राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाले आहेत.      मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य  कन्हेरवाडी चे भुमिपुत्र डॉ.भास्कर  सोपानराव मुंडे यांचे युवराज हे सुपुत्र आहेत. या यशाबद्दल पुणे इन्कमटॅक्स आयुक्त  विश्वास सोपानराव मुंडे  (IRS), पुणे समाज कल्याण आयुक्त  सौ.दीपाताई  विश्वासराव मुंडे IAS, न्यायाधीश आनंद सोपानराव मुंडे ,डॉ. कल्याण सोपानराव मुंडे , नारायण फड आदींनी या यशाबद्दल  अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ...
इमेज
  परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील गुन्हेगारांच्या दहशतीखाली शहर, पोलीस प्रशासन नेमके करतेय तरी काय?;खून, मारामाऱ्या, टोळक्यांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचे सावट परळी | प्रतिनिधी एकेकाळी शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या परळी शहराची ओळख आता दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होत चालली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, सार्वजनिक ठिकाणी मारामाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या घटना आणि कायद्याला खुलेआम आव्हान देणारे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे परळीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळी शहरात कायदा संस्थेचे तीन तेरा झाले असून पोलीस प्रशासनाचा कसलेही प्रकारचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या बाबत आपण लवकरच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.    ...
इमेज
  परळी गंगाखेड रोडवरील  पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे --मनसे   परळी- गंगाखेड रोड वरील शक्तीकुंज वसाहत जवळील पुलाचे काम रखडल्यामूळे नागरीकांसाठी तो मृत्युचा सापळा बनला आहे. आज मनसे कडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन पाठवण्यात आले. पुलाचे काम रखडल्यामुळे अनेक नागरीक या ठिकाणी पडत आहेत. येत्या आठ दिवसात पुलाचे काम चालू नाही झाल्यास मनसे कडून तीव्र आंदोलन करण्या येईल असा इशारा मनसे कडून देण्यात आला.या प्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष दत्ता दहिवाळ,तालुकाधयक्ष श्रीकांत पाथरकर,तालुकाउपाध्य ऋषिकेश बारगजे, विठ्लदादा झिल्मेवाड, प्रशांत कामाळे, लक्ष्मण शिंदे,आत्माराम खंदारकर,सचीन आघाव, महेश शेप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या