शेतातील विद्युत मोटारी आणि वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ....
पावसाने अडवलं... अन् चोरांनी लुबाडलं! गोवर्धन शिवारातून बोरवेलची ५ एचपी मोटार व वायर चोरी; पिके वाचविण्याचाच आधार हिरावला परळी वैजनाथ, प्रतिनिधी : परळी वैजनाथ तालुक्यातील गोवर्धन येथील ७५ वर्षीय शेतकरी अनंत रंगनाथ जाधव यांच्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिकांना जगविण्यासाठी विहीर व बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील बोरवेलची ५ एचपीची मोटार आणि वीज वायर चोरी करून नेल्याने पिके वाचविण्याचाच आधार हिरावला गेला आहे. गोवर्धन शिवारातील 'चोपन' नावाच्या शेतातून जीके एनर्जी लिमिटेड कंपनीची ५ एचपीची मोटार व वीज वायर २३ ते २४ जूनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अनंत जाधव यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र मोटार व वायरचा कोणताही मागमूस लागला नाही.अखेर २ जुलै रोजी त्यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....