मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

इमेज
  आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्...

 महाराष्ट्र राज्य एस.टी. निवृत्त कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा प्रादेशिक सचिवपदी हेमंत कुलकर्णी यांची फेरनिवड




परळी वैजनाथ | प्रतिनिधी...

   महाराष्ट्र राज्य निवृत्त परिवहन कर्मचारी संघटनेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या केंद्रीय कार्यकारिणी बैठक व वार्षिक अधिवेशनात मराठवाडा प्रादेशिक सचिवपदी परळी वैजनाथ येथील श्री. हेमंत कुलकर्णी यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा प्रादेशिक सचिव पदाची जबाबदारी सोपविली असून या निवडीबद्दल श्री. कुलकर्णी यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


   याच बैठकीत महाराष्ट्र राज्य निवृत्त परिवहन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी कमलाकर रोटे (कोल्हापूर), महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी महादेव कुलकर्णी (सांगली), सरचिटणीसपदी सदानंद विचारे (ठाणे), संघटक सचिवपदी प्रभाकर आंबेकर (बीड) तसेच कोषाध्यक्षपदी गणेश वायफळकर (मुंबई) तर छत्रपती संभाजी नगरचे सय्यद हमीद यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.


   मराठवाडा प्रादेशिक सचिवपदी फेरनिवड झाल्यानंतर हेमंत कुलकर्णी यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरचिटणीस सदानंद विचारे यांचा देखील त्यांच्या गत वर्षातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. बैठकीत नव्याने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः ईपीएफ-९५ अंतर्गत पेन्शन वाढीसाठी संघटनेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यभर पदाधिकाऱ्यांचे दौरे आयोजित करून मेळावे घेण्यात येणार असून, पेन्शन वाढीसाठीच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचे सांगण्यात आले.

याशिवाय सेवानिवृत्त परिवहन कर्मचाऱ्यांचे सभासदत्व वाढविणे, वैद्यकीय भत्ता मिळवून देणे, न्यायालयीन प्रकरणांबाबत पाठपुरावा करणे तसेच वर्षभरासाठी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवास पास उपलब्ध करून देण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, संघटनेच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या