दुर्दैवी घटना....कुटुंबाचा आधार गेला !

इमेज
पेरणीसाठी अर्थिक विवंचनेतील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केज :- प्रतिनिधी... पेरणीसाठी पैसे नसल्याने हताश झालेल्या एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली आहे.  केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या कोरडेवाडी येथील तरुण शेतकरी बाबू सुभाष यादव वय (२६ वर्ष) या शेतकऱ्याच्या नावावर २ हेक्टर २० आर जमीन आहे. मागील आठवड्या पासून पाऊस पडू लागल्याने शेतकरी पेरणी करू लागले आहेत. बाबू यादव यांनी जवळ असलेल्या पैशातून थोडी फार पेरणी केली. मात्र पूर्ण शेताची पेरणी करण्यासाठी त्याच्या जवळ पैसे नसल्याने ते हताश झाले होते. पेरणी वेळेवर न झाल्यास शेती पडीक राहील, या विचाराने आलेल्या नैराश्यातून बाबू यादव यांनी टोकाची भूमिका घेऊन १ जुलै रोजी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.  या घटनेची माहिती मिळताच जमादार पुरुषोत्तम शेप, पोलीस नाईक गोरख फड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या घटनेची केज पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. मयत ...

शिक्षकांवरचा भार कमी....अध्यापन कार्यही होणार सुरळीत!

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण : आता बिएलओंना सहाय्यक म्हणून शिक्षकां शिवाय इतर शासकीय / निमशासकीय कर्मचारी नियुक्त 

एमबी न्यूज ने शाळांचा विषय आणला होता ऐरणीवर

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

     राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आल्याने परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दै. पुढारीने समोर आणले होते.त्यानंतर आता या कामासाठी बिएलओंना सहाय्यक म्हणून शिक्षकांशिवाय इतर शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळाही सुरु राहतील व अध्यापन व्यवस्थाही निरंतर चालेल यादृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

        भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला असून त्याअनुषंगाने, परळी वैजनाथ तालुक्यात ही मोहीम सुरु झाली आहे. कामकाज हे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे दि. ३०/०६/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून जि.प.शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) याना देण्यात आलेले सहाय्यक हे सुद्धा बहूतांश प्रमाणात शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे वास्तव चित्र समोर आले. या अनुषंगाने आता या कामासाठी बिएलओंना सहाय्यक म्हणून शिक्षकांशिवाय इतर शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सहाय्यक म्हणून आता शिक्षकांना नियुक्ती न देता ग्रामीण भागामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक, अंगणवाडी सेवीका, विद्युत वितरण कंपनीचे मिटर रिडींग घेणारे कर्मचारी, पोस्टमन व असे कर्मचारी ज्यांना सदर गावातील स्थानिक माहिती आहे व इतर शासकीय / निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

"शाळांमधील अध्यापन सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करून शाळाही सुरु राहतील आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचे राष्ट्रीय कामही होईल असे सुक्ष्म नियोजन परळी वैजनाथ येथे करण्यात आले आहे.यासाठी शिक्षकांव्यतिरिक्त ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक, अंगणवाडी सेवीका अशा इतर शासकीय / निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे."

  - *अरविंद लाटकर*

उपविभागीय अधिकारी, परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या