दुर्दैवी घटना....कुटुंबाचा आधार गेला !

इमेज
पेरणीसाठी अर्थिक विवंचनेतील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केज :- प्रतिनिधी... पेरणीसाठी पैसे नसल्याने हताश झालेल्या एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली आहे.  केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या कोरडेवाडी येथील तरुण शेतकरी बाबू सुभाष यादव वय (२६ वर्ष) या शेतकऱ्याच्या नावावर २ हेक्टर २० आर जमीन आहे. मागील आठवड्या पासून पाऊस पडू लागल्याने शेतकरी पेरणी करू लागले आहेत. बाबू यादव यांनी जवळ असलेल्या पैशातून थोडी फार पेरणी केली. मात्र पूर्ण शेताची पेरणी करण्यासाठी त्याच्या जवळ पैसे नसल्याने ते हताश झाले होते. पेरणी वेळेवर न झाल्यास शेती पडीक राहील, या विचाराने आलेल्या नैराश्यातून बाबू यादव यांनी टोकाची भूमिका घेऊन १ जुलै रोजी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.  या घटनेची माहिती मिळताच जमादार पुरुषोत्तम शेप, पोलीस नाईक गोरख फड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या घटनेची केज पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. मयत ...

८ व ९ जुलै... दोन दिवस पालखी परळीत.,......

 श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे 9 जुलै रोजी परळी शहरात आगमन ; दि.8 जुलै 2026 थर्मल कॉलनीत मुक्काम 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवार दि.9 जुलै 2026 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे. 

 शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. 21 जून 2026 रोजी श्रींचे पालखीचे शेगांव येथून प्रस्थान झाले असुन दि.8 जुलै 2026 बुधवार रोजी रात्री थर्मल कॉलनी परळी वैजनाथ येथे मुक्काम पालखीचा राहणार असुन गुरुवार दि.9 जुलै 2026 रोजी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहरातील अग्रवाल लॉज, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक मार्गे जगमित्र नाना मंदिर ह्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. गुरुवार दि.09 जुलै 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची देणगी हासानंद बेगराज सामत कापड दुकान व अतुल क्लॉथ येथे स्विकारली जाईल. सर्व कापड व्यापारी व विविध व्यापारी यांच्याकडुन पालखीची सेवा व व्यवस्था केली जाते अशी माहिती विजय हासानंद सामत (मो.9850771177), बाबुराव मेनकुदळे, सुभाष मुंडे, विक्रम देशमुख, श्रीकांत गुंडाळे, रंजित भोयटे, रामकिशन देवशटवार यांनी दिली.

 श्री गजानन महाराज यांची पालखी गुरुवार दि.09 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासुन परळीतील जगमित्र नागा मंदिर येथे थांबणार असुन दि.10 जुलै 2026 शुक्रवार रोजी कन्हेरवाडी मार्गे अंबेजोगाई व पुढे श्री क्षेत्र पंढरपुरकडे पालखीचे प्रस्थान होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट