पोस्ट्स

ऑगस्ट ९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परळीच्या नकाशावर आणखी एक ‘मोठे केंद्र’...

इमेज
  ऐतिहासिक झेप: पंकजाताईंच्या दूरदृष्टीतून परळीत साकारतेय पशुसंवर्धनाचे ‘पॉवर सेंटर’! लोकनेत्याच्या संस्कारातून वैद्यनाथाच्या भूमीत निर्माण होणार पशुसंवर्धनाची नवी गाथा!       प रळीच्या विकासात्मक जडणघडणीच्या इतिहासात आणखी एक मोठे पान लिहिले जात आहे. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची धार्मिक नगरी, ऊर्जा नगरी अशी ओळख असलेल्या परळीला आता पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन, उपचार आणि आधुनिक पशुसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे. परळीची लेक राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या दूरदृष्टीतून परळी येथे भव्य पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय संकुल उभारणीच्या दिशेने आज पायाभरणीचे निर्णायक पाऊल पडत आहे. हा एक इतिहास ठरणार आहे. हा केवळ एक कॉलेज प्रकल्प नाही; तर शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी आणि संपूर्ण पशुसंवर्धन क्षेत्राच्या भविष्यात बदल घडविणारी मोठी पायाभूत गुंतवणूक ठरणार आहे.५६४ कोटींच्या या प्रकल्पाची भूमिपूजनाची ही कोनशिला परळीच्या विकासातील नवी झेप ठरणार आहे.      परळीची लेक राज्याची पशुसंवर्धन मंत्री झाल्याबरोबर एक मोठं आणि पिढ्यान...

ना.पंकजा मुंडेंच्या दूरदृष्टीने परळीत उभे राहणार पशुसंवर्धनाचे 'पॉवर सेंटर'!...

इमेज
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ना.पंकजा मुंडे उद्या परळीत ; नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन ना.पंकजा मुंडेंच्या  दूरदृष्टीने परळीत उभे राहणार पशुसंवर्धनाचे 'पॉवर सेंटर'! परळी वैजनाथ दि. १४ -- महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत परळी वैजनाथ येथे उभारण्यात येत असलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते व राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या स्वातंत्र्यदिनी दुपारी २ वाजता मोठ्या थाटात संपन्न होत आहे.          ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला, नंदागोळ रोड, येथे हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास खा. बजरंग सोनवणे, आ.  धनंजय  मुंडे, आ. सतीश  चव्हाण, आ. बसवराज  पाटील, आ. डॉ. परिणय फुके, आ. विक्रम काळे, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ.नमिता मुंदडा, आ. संदीप क्षीरसागर, आ. विजयसिंह पंडित, आ. चैनसुख संचेती, आ. राजकुमार बडोले, आ. संजय मेश्राम, नगराध...
इमेज
परळीतील आदर्श शिक्षक गोविंदराव (तात्या) भातलंवडे यांचे दुःखद निधन परळी वैजनाथ:( प्रतिनिधी)      परळी शहरातील बालाजी मंदिर येथिल रहिवासी आणि आदर्श निवृत्त शिक्षक गोविंदराव (तात्या) भातलंवडे यांचे आज (दि. १४) सकाळी ११:३० वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. गोविंदराव भातलंवडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांनंतर त्यांना परळी येथील राहत्या घरी आणण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६:०० वाजता परळी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, त्यांचे जुने सहकारी आणि त्यांचे असंख्य विद्यार्थी  उपस्थित होते. स्व. गोविंदराव भातलंवडे यांनी परळी तालुक्यात आपल्या अध्यापन कौशल्याचा एक वेगळा ठसा उमटवला होता. तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्यांच्या...
इमेज
  संपादक बालासाहेब फड वंजारी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित परळी (प्रतिनिधी) —      वंजारी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिव्यांग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब घुगे, सौ. यमुनाताई बाळासाहेब घुगे आणि डॉ. संकेत सानप यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘दैनिक सोमेश्वर साथी’चे संपादक बालासाहेब फड यांना पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यांच्या न्याय-हक्कासाठी सातत्याने लेखणी चालविल्याबद्दल ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. बालासाहेब फड यांनी आपल्या निर्भीड, निःपक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेतून शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला तसेच विविध सामाजिक वंचित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक कार्यवाही घडवून आणण्यासाठी त्यांच्या ...
इमेज
  बेलवाडी मठात महिनाभर मौन तपोअनुष्ठान: नीलकंठ शिवाचार्य महाराजांनी घेतले वैद्यनाथांचे दर्शन परळी वैजनाथ : प्रतिनिधी      श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहाटे गदगेश्वर हिरेमठ, तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा (कर्नाटक) येथील श्री ष. ब्र. १०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज यांनी प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मठपती दयानंद स्वामी, अनिरुद्ध स्वामी यांची उपस्थिती होती. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी नीलकंठ शिवाचार्य महाराजांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी विकास हालगे, गिरीश संकाये, संजय खाकरे, सोमनाथ गोपनपाळे, नंदीकोल्हे आप्पा आदी उपस्थित होते. बेलवाडी मठात महिनाभर मौन तपोअनुष्ठान श्रावणमासनिमित्त नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या श्री संत गुरुलिंग स्वामी मठ, बेलवाडी येथे महिनाभराच्या मौन तपोअनुष्ठानास प्रारंभ झाला आहे. श्रावण महिन्यातील आध्यात्मिक साधनेचा एक भाग म्हणून हे तपोअनुष्ठान करण्यात येत आहे. या तपोअनुष्ठानाच्या निमित्ताने बेलवाडी मठ परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ...
इमेज
  श्रावण प्रथम दिन :  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ : प्रतिनिधी      देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली. सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी गुरुवारी सकाळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेत अभिषेक व पूजा केली.  श्रावण महिन्याच्या प्रारंभामुळे वैद्यनाथ मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविक दर्शनासाठी दाखल होत होते. याच भक्तिमय वातावरणात नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी वैजनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख यांनी नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे स्वागत करून सत्कार केला. मंदिरातील धार्मिक विधीनंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी पत्रकार संजय खाकरे, शिरीष स्वामी, विकास हालगे, सोमेश्वर लिंगाडे  यांच्यासह पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या प्रशिक्षणातून रेशीम शेतकऱ्याची उत्तुंग भरारी एका बॅचमध्ये एका महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक उत्पादन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ग्लोबल विकास ट्रस्टच्या शास्त्रीय प्रशिक्षणाचा आणि सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेत बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रेशीम उद्योग बंद करण्याच्या निर्णयापासून थेट एका बॅचमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक उत्पादन घेण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. परळी तालुक्यातील इंजेगाव येथील शेतकरी गोपाल गोविंद कराड हे मागील दोन वर्षांपासून तुती लागवड करून रेशीम उद्योग करत होते. मात्र अपेक्षित उत्पादन मिळत नसल्यामुळे त्यांच्या रेशीमच्या बॅचेस वारंवार फेल जात होत्या. त्यामुळे आर्थिक नुकसान होत होते आणि त्यांनी रेशीम उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत मे महिन्यात ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित रेशीम शेती प्रशिक्षणात त्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान शास्त्रीय पद्धतीने रेशीम संगोपन, बॅच व्यवस्थापन, रोग नियंत्रण, पानांचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन...
इमेज
श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड; मच्छिंद्रनाथ देवस्थानाला २.५१ लाखांची चांदी अर्पण  कडा : प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थानाच्या विकासासाठी भाविक, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून सहकार्याचा ओघ वाढला आहे. आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा युवा उद्योजक अशोक चौधरी यांनी देवस्थानासाठी एक किलो चांदीची वस्तूरूप देणगी दिली. सुमारे २ लाख ५१ हजार रुपये किमतीची ही देणगी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली. श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थान हे आष्टी तालुक्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवस्थानाच्या विकासासाठी विविध स्तरांतून प्रयत्न सुरू असून, आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर उभारणीसह विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. या विकासकामांना हातभार लागावा, या उद्देशाने अशोक चौधरी यांनी रोख रकमेऐवजी चांदीच्या स्वरूपात देणगी देत धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. चौधरी यांनी दिलेली १ हजार ग्रॅम म्हणजेच एक किलो चांदी देवस्थानाच्या...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...

इमेज
  तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बालकांचे हक्क, संरक्षण, शिक्षण आणि न्याय याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण समारंभानंतर दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, परळी वै. येथून मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड, तालुका विधी सेवा समिती, परळी वै., वकील संघ परळी वै., तालुका पोलीस प्रशासन तसेच इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बालकांशी संबंधित विविध...

बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीने चैतन्य....

इमेज
  माजलगावात भाजपाची भव्य तिरंगा रॅली; देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले शहर माजलगाव (प्रतिनिधी) : बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य-दिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात डौलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा आणि उत्स्फूर्त नागरिकांचा सहभाग यामुळे संपूर्ण शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक सहभागी झाले होते. रॅलीतील तिरंग्यांची आकर्षक सजावट आणि देशभक्तीचा उत्साह लक्षवेधी ठरला. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली माजलगावकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भव्य स्वरूपात पार पडली. रॅलीच्या माध्यमातून ‘तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक आहे’, हा संदेश देण्यात आला. संपूर्ण रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना ओ...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन......

इमेज
  उद्या परळीत तिरंगा रॅली ; सहभागी होण्याचे भाजपचे आवाहन परळी वैजनाथ, दि. १२ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने परळी शहरात उद्या गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार ही रॅली काढण्यात येणार असून, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात होणार असून बस स्टँड रोड, एक मिनार चौक, स्टेशन रोड मार्गे मार्केट कमिटी येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील ज्येष्ठ मंडळी, प्रमुख पदाधिकारी, विविध संस्थांचे संचालक, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष राजेश गित्ते, वसंत निर्मळ, शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.
इमेज
  संतभूमी संरक्षणाच्या लढ्याला महाराष्ट्रव्यापी दिशा; पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ : संतभूमीच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे दि. १० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील निष्ठावंत वारकरी, संतप्रेमी, पर्यावरणवादी, इतिहास संशोधक व अभ्यासकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सन २००७ पासून सुरू असलेल्या संतभूमी संरक्षणाच्या आंदोलनाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला आता अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप देण्याचा निर्णय उपस्थितांच्या सर्वसंमतीने घेण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले— १) आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रभर व्याप्ती वाढविणे. संतभूमी, भंडारा-भामचंद्र आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय वारशाच्या संरक्षणाचा विषय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. २) ‘भंडारा-भामचंद्र बचाव मुक्ती संघ...

दिव्यांग भाविकांसाठी सुलभ दर्शनाची मागणी...

इमेज
  पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी परळी तालुक्यातील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करा – डॉ. संतोष मुंडे दिव्यांग जेष्ठ नागरिक यांना स्वतंत्र दर्शन रांग करा -डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक परळी वैजनाथ येथे येत आहेत. मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागत असल्याने स्थानिक भाविकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे परळी वैजनाथ तालुक्यातील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करावी, अशी मागणी दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, व्हीलचेअर आणि वॉकरची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आ. धनंजय मुंडे, ना. पंकजाताई मुंडे, तहसीलदार व वैद्यनाथ मंदिर देवल कमिटी यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराची आराधना, उपासना आणि भक्तीचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भावि...
इमेज
  महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा    परळी वैजनाथ , प्रतिनिधी ....          कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष  प्रा. प्रसाद देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय ग्रामीण रुग्णालय परळी वै. येथील समुपदेशक शरद चव्हाण हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या र्डॉ.विद्याताई देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.         कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी विवेकानंद कवडे यांनी प्रास्ताविकात प्रस्तुत कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.प्रमुख पाहुणे समुपदेशक शरद चव्हण यांनी त्यांच्या वक्तव्यातून  विद्यार्थिनींना आरोग्य विषयक माहिती दिली व एड्स विषयीचे सविस्तर मार्गदर्शन केले व क्युआर कोड बद्दल माहिती दिली. ...

आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक

इमेज
  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी; श्रावणापूर्वी स्वच्छतागृहे खुली करण्याची मागणी परळी/प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था व्हावी यासाठी समाजवादी पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सालेहा शेख जिलानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून श्रावणापूर्वी परळीतील नव्याने बांधलेली सुलभ शौचालये तातडीने खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.       जिल्हाधिकारी, बीड यांनी १२ जून २०२५ रोजी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालये उभारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिलानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अनेक ठिकाणी अपेक्षित कार्यवाही झालेली नसली तरी परळी नगर परिषदेने शहरात ३ ठिकाणी ठिकाणी महिला आणि पुरुष सुलभ शौचालये बांधली आहेत. ती तातडीने नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. ◾ श्रावणात भाविकांची मोठी गर्दी परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग असल्याने श्रावणात देशभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येतो. त्य...

संकलक :श्री. हिरालाल तिवारी.......

इमेज
  नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?        श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा ! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा’, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्षी १७ ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते.  या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहणार आहोत.  *1. नागपंचमीचा इतिहास :* सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होत...

कार्यगट क्रमांक पाच मध्ये अंकुश शिंदे यांचा समावेश...

इमेज
एमपीएससीच्या अभ्यासक्रम पुनरावलोकनासाठी कार्यगटांच्या रचनेत सुधारणा माजी पोलीस आयुक्त व विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांची महाराष्ट्र राज्य  सदस्यपदी निवड  अंबाजोगाई (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या कार्यगटांच्या रचनेत महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यासंदर्भात १० ऑगस्ट २०२६ रोजी कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन -मित्र अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या कार्यगट क्रमांक ४ आणि कार्यगट क्रमांक ५ यांच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. कार्यगट क्रमांक ४ मध्ये चंद्रकांत दळवी यांची प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे गट-क व अराजपत्रित गट-ब पदांच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी असलेल्या कार्यगट क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. डॉ. प्रमोद शिंदे आणि श्री. दिनेश दळवी यांच्या जागी पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचा प्रमुख म्हणून समावेश करण्यात आला आहे. या कार्यगटात म...

दि. १३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ येथेप्रांतीय अधिवेशन...

इमेज
इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांताचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर परळीतील प्रांतीय अधिवेशनात होणार मान्यवरांचा गौरव परळी वैजनाथ, प्रतिनिधी : इतिहास संशोधन, अध्यापन, शैक्षणिक कार्य आणि संघटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चार मान्यवरांना इतिहास संकलन संस्था, महाराष्ट्र – देवगिरी प्रांताच्या वतीने यंदाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण दि. १३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे आयोजित पाचव्या प्रांतीय अधिवेशनात करण्यात येणार आहे. इतिहास संकलन संस्थेच्या परंपरेनुसार इतिहास क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारार्थींची निवड २७ जुलै रोजी झालेल्या देवगिरी प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत सखोल चर्चेनंतर एकमताने करण्यात आली. यंदाचा 'बाबासाहेब आपटे ज्येष्ठ इतिहास संशोधक पुरस्कार' धाराशिव येथील प्रा. डॉ. सतीश कदम यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य इतिहास संशोधक म्हणून ओळख असलेल्या डॉ. कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तुळजाभवानी मंदिराचा इतिहास, ...
इमेज
रोटरी क्लब अंबाजोगाई सिटीला प्रांतातील सर्वोत्तम क्लबचा बहुमान वर्षभरात ५० हून अधिक पुरस्कार; एनआयसीयू ची उभारणी ते वृक्षारोपणापर्यंत उल्लेखनीय कार्य अंबाजोगाई-:  सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावातून रोटरी क्लब अंबाजोगाई सिटीने रोटरी वर्ष २०२५-२६ मध्ये संपूर्ण रोटरी प्रांत ३१३२ मध्ये आपला ठसा उमटवला आहे. वर्षभरातील विविध उपक्रमांची  दखल घेत क्लबला ५० हून अधिक पुरस्कार व सन्मानप्राप्त झाले आहेत. त्यापैकी २५ प्रमुख पुरस्कारांचा गौरव ९ ऑगस्टरोजी लातूर येथील गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला.या सोहळ्यास प्रांतपाल  जयेश पटेल, माजी प्रांतपाल  सुधीर लातूरे, उपप्रांतपाल  प्रवीण देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.     या सोहळ्यात क्लबला मिळालेला सर्वात मोठा बहुमान म्हणजे  सर्वंकष  सर्वोत्तम रोटरी क्लब पुरस्कार – प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कारप्रा .रोहिणी पाठक, तसेच सर्वोत्तम साक्षरता प्रकल्प – प्रथम क्रमांक, सर्वोत्तम महिला सक्षमीकरण प्रकल्प – प्रथम क्रमांक, याशिवाय मुलगी वाचवा, व्यावसायिक सेवा, जनसंपर्क, पर्यावरण, आरवायएलए...
इमेज
पोस्ट ऑफिसमध्ये पैसे  भरायला आलेल्या वृद्ध महिलेची ५० हजारांची पिशवी हिसकावली परळी वैजनाथ : प्रतिनिधी..     येथील पोस्ट ऑफिसमध्ये पैसे टाकण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेला धक्का देऊन तिची पिशवी हिसकावून घेऊन ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात एक अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक कॉलनी, परळी वैजनाथ येथील पद्मिनी संदीपान सूर्यवंशी (वय ७०) या वयोवृद्ध असून, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिस, परळी वैजनाथ येथे पैसे टाकण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या जवळच असलेल्या अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी महिलेने त्यांच्या पाठीमागून येत धक्का दिला. या गोंधळाचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतील  ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर या वृद्ध महिलेने संभाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गु.र.नं. १८९/२०२६, कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदा...
इमेज
परळीच्या अक्षय क्षिरसागरची पुणे मेट्रोमध्ये पायलट म्हणून निवड अभियांत्रिकी शिक्षणानंतर मिळविले उल्लेखनीय यश; क्षिरसागर कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथील दैनिक मराठवाडा साथीचे विशेष प्रतिनिधी तथा किसान ट्रॅक्टर्सचे संचालक श्री. संजय देविदासराव क्षिरसागर यांचे सुपुत्र चि. अक्षय संजय क्षिरसागर याची पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात मेट्रो पायलट म्हणून निवड झाली आहे. आवश्यक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अक्षयने मेट्रो पायलट म्हणून आपली सेवा सुरू केली असून, त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे परळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अक्षयचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे इंग्रजी माध्यमातून झाले. त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकी शिक्षणानंतर पुणे मेट्रोच्या पायलट पदासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करून त्याने ही जबाबदारी स्वीकारली. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक ...

सिकंदराबाद विभागीय सेक्युरिटी कमिशनर यांनी केली कारवाई...

इमेज
  परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात महिलेची छेड काढणारा ‘तो’ आरपीएफ जवान तडकाफडकी निलंबित परळी वैजनाथ / एमबी न्यूज वृत्तसेवा:        परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात महिलेची छेड काढून मद्यधुंद अवस्थेत राडा करणाऱ्या आर पी एफ जवानावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सुनील कुमार असे या जवानाचे नाव असून, घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून ही कारवाई केली.        परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात ऑन ड्युटी असलेल्या सुनील कुमार या जवानाने मद्यधुंद अवस्थेत एका महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने आणि उपस्थित प्रवाशांनी त्याला जाब विचारला. यावेळी परिस्थिती चिघळली आणि संतप्त नागरिकांनी जवानाला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच आर पी एफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संबंधित जवानाची चौकशी केली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आर पी एफ चे सेक्युरिट...

अंबरनाथमधील 'त्या' घटनेची ना.पंकजा मुंडेंनी घेतली दखल..

इमेज
मानवाप्रमाणेच प्राण्यांच्या जीवाचंही तेच मोल, अशी क्रूरता अक्षम्य आहे ; आरोपीवर तातडीने कारवाई करा अंबरनाथमधील 'त्या' घटनेची ना.पंकजा मुंडेंनी घेतली दखल ;  ठाण्याच्या एसपींना केली सूचना मुंबई दि. ११ --- अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-2 मध्ये २६ जुलैला बाराव्या मजल्यावरून मांजरीला खाली ढकलून ठार केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर  राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाईसाठी पत्र पाठवले आहे. 'प्राण्यांच्या जीवाचे मोल जपणे हे आपले कर्तव्यच आहे, मी स्वतः यात लक्ष घातले आहे, अशी क्रूरता अक्ष्यम आहे' अशा शब्दांत त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात पंकजाताई मुंडे यांनी त्या घटनेचा उल्लेख करत नमूद केले आहे, की मांजराच्या लहान पिल्लाला इमारतीवरून एका व्यक्तीने खाली फेकल्यामुळे मृत्यू झाल्याची बदलापूर येथील घटना निदर्शनास आली आहे. या विरोधात स्थानिक प्राणिमित्र संघटनांनी कारवाई होत नसल्याने रोष व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिय...

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा उद्देश

इमेज
  नवीन पुस्तक अभ्यासक्रम प्रशिक्षणाचा शुभारंभ परळी / प्रतिनिधी      शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने माउंट लिटेरा झी स्कूल परळी वैजनाथ येथे इयत्ता सहावीच्या नवीन पुस्तक अभ्यासक्रम प्रशिक्षणाचा शुभारंभ आज दि ११ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. श्रीमती फुंदे एस. एन. व श्रीमती देशपांडे एम. जी. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.उद्घाटन प्रशिक्षण प्रमुख  दहिफळे बी. व्ही. यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व प्रार्थना श्री राजकुमार ठोके सरांनी आपल्या सुरेल आवाजात सादर करून वातावरण भारावून टाकले.सुलभकांचा सन्मानप्रशिक्षणासाठी निवडलेल्या सुलभकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये  लोंढे एम. एन. सर,अमोल कांबळे सर, राजकुमार ठोके सर, अनुपकुमार कुसुमकर सर, गजानन जोशी सर, गोचडे एफ. जी. सर व सोळंक...

तारखेत बदल.....

इमेज
परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमीपूजन तारखेत बदल ; भूमीपूजन आता १४ ऐवजी १५ ऑगस्टला मुंबई दि. १० --  ५६५ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या तारखेत बदल झाला असून आता हे भूमीपूजन १४ ऐवजी १५ ऑगस्ट रोजी होणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.   १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वा. उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली  ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ असलेल्या टेकडीवरील मैदानात हा भूमीपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून सध्या तयारी सुरू झाली आहे.      बीड येथे शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जालना येथील ध्वजारोहण आटोपून ना. पंकजाताई मुंडे परळीत येणार आहेत. प्रशासनाने तारखेतील बदलाची नोंद घेत कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. ••••

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
■ माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......      माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त (दि.११) रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.      राज्याचे माजी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याप्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त  दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. त्या अनुषंगाने स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे दि.११ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वा.पासुन शिबिराचा शुभारंभ होणार आहे. दिवसभर रक्तदात्यांना रक्तदान करता येणार आह...

व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध- सुरेंद्र रेदासणी

इमेज
मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे नुतन अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, महासचिव संदीप लाहोटी यांचा सत्कार उत्साहात व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध- सुरेंद्र रेदासणी व्यापाऱ्यांची एकता हीच आपली शक्ती- संदीप लाहोटी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) व्यापारी वर्गाची अतिशय महत्वाची संघटना अशी ओळख असलेल्या मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी सुरेंद्र रेदासणी, महासचिवपदी संदीप लाहोटी यांची निवड झाल्याबद्दल परळी वैजनाथ विविध व्यापारी महासंघाच्यावतीने भव्य सत्कार उत्साहात संपन्न झाला. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही नुतन अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांनी दिली तर व्यापाऱ्यांची एकता हीच आपली शक्ती असल्याचे प्रतिपादन नुतन महासचिव संदीप लाहोटी यांनी केले. यावेळी शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.        श्रद्धा मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या  सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन...

गणेशपार भागात 20 तासांपासून बत्ती गुल

इमेज
  गणेशपार भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवा अन्यथा आंदोलन करु-अश्विन मोगरकर गणेशपार भागात 20 तासांपासून बत्ती गुल परळी (प्रतिनिधी) गणेशपार येथील विद्युत रोहित्र खराब झाल्याने मागील १८ तासांपासून संपुर्ण गणेशपार भागात अंधार असून महावितरण अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने महावितरण विरोधाच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी दिला आहे. गावभागातील महत्वाचा भाग असलेल्या गणेशपार येथील विद्युत रोहित्र शनिवार, ८ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता बंद पडले. विद्युत रोहित्रातून अचानक ऑइल गळती होत असल्याचे निदर्शनास आल्याने लाईट बंद करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून या विद्युत रोहित्र व फ्यूज बॉक्सची दुरुस्ती करण्यासाठी महावितरण कडे पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप अश्विन मोगरकर यांनी केला आहे. सततचा विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत रोहित्राजवळ जाळ होणे, तारेवरती आलेले झाडे तोडणे अश्या अनेक समस्या बाबत वारंवार दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. सततच्या या दुर्लक्षामुळे गावभागातील नागरिकांत...

परळीचा लौकिक वाढेल - ना. पंकजा मुंडे

इमेज
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळीच्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे १४ ऑगस्टला भूमीपूजन जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर राहणार उपस्थित परळी वैजनाथ दि. ०९ --- शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या आणि ५६५ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन येत्या १४ ऑगस्ट रोजी उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून सध्या तयारी सुरू झाली आहे.     शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ असलेल्या टेकडीवरील मैदानात हा भूमीपूजन कार्यक्रम पार पडणार आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार १४ ऑगस्टला तर ना. पंकजा मुंडे १३ तारखेला परळीत येणार आहेत. कार्यक्रमास आ. धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हयातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  ना. पंकजा मुंडेंचा सिंहाचा वाटा -------- प...