MB NEWS:माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ रोजी फेसबुक लाइव्ह व्याख्यानाचे आयोजन

 माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ रोजी फेसबुक लाइव्ह व्याख्यानाचे आयोजन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहाचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी, कष्टकरी,कामगार, गोरगरीब, दीनदलित यांचे कैवारी बीडचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 1 ऑक्टोबर 2020 सायंकाळी सात वाजता यावर्षी कोरोना आजाराच्या महामारीमुळे फेसबुक लाइव्ह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉ. गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.

        या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत कॉ. डॉ.अशोक ढवळे (अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय अध्यक्ष) यांचा व्याख्यानाचा विषय आहे - शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे आणि आपण. या बरोबरच दुसरे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत डॉ. डी. एल. कराड राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.टु.यांचा व्याख्यानाचा विषय आहे - कामगार कायद्यातील बदल नेमके कोणासाठी ?

    फेसबुकवर लाईव्ह व्याख्यानासाठी खालील लिंकवर जाऊन सहभागी व्हावे.

https://www.facebook.com/maharashtra.cpim/

---------------------------------------------------------------------------

*स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट नेते, माजी खासदार कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे स्मृति व्याख्यान !*

गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२०

सायंकाळी ठीक ७ वाजता

➡️

♦️विषय : शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे आणि आपण

वक्ते : *डॉ. अशोक ढवळे*

(राष्ट्रीय अध्यक्ष, किसान सभा)

➡️

♦️ विषय : कामगार कायद्यातील बदल नेमके कोणासाठी ?

वक्ते : *डॉ. डी. एल. कराड*

(राष्ट्रीय उपाध्यक्ष, सीटू)

*प्रस्तावना:*

*ऍड. अजय बुरांडे*

*डॉ. महारुद्र डाके*

व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंक फॉलो करावी : ⤵️

*https://www.facebook.com/maharashtra.cpim/*

आपले विनीत :*कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे स्मृति प्रतिष्ठान, अंबाजोगाई* व *भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी ) महाराष्ट्र राज्य कमिटी*

----_-----------------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार