युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS: *'त्या' तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल* *आरोपीना तातडीने अटक करून कारवाईचे बीड पोलिसांना निर्देश*

 *'त्या' तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल*


*आरोपीना तातडीने अटक करून कारवाईचे बीड पोलिसांना निर्देश*



बीड (दि. १५) ---- : नांदेड जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणीवर ऍसिड व पेट्रोल टाकून जाळल्यानंतर काही तासांनी रुग्णालयात त्या तरुणीचा मृत्यू झाला. हा प्रकार संतापजनक असून बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, तातडीने आरोपींना अटक करावी तसेच कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलिसांना दिले आहेत.


याबाबत ना. मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पुणे येथे वास्तव्यास असलेल्या व मूळच्या नांदेड जिल्ह्यातील असलेल्या २२ वर्षीय तरुणीला पुणे ते नांदेड प्रवास करत असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोबतच्याच संशयित आरोपींनी आधी ऍसिड टाकून व नंतर पेट्रोल टाकून जाळले. आज (दि. १५) रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


या घटनेबद्दल ना. मुंडे यांनी दुःख व संताप व्यक्त केला असून, बीड पोलीस तातडीने आरोपीला गजाआड करण्यात यशस्वी होतील, तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या