ऐसा आनंद सोहळा, जगमित्र नागा पाहे डोळा”

इमेज
संत जगमित्रनागा अभंग गाथेच्या प्रकाशनानंतर संत जगमित्रनागांची जन्मभूमी पिरंगुटमध्ये स्वागत व सत्कार पिरंगुट, प्रतिनिधी : ऐतिहासिक संतभूमी पिरंगुट येथील १३व्या शतकातील संतश्रेष्ठ जगमित्र नागा महाराज यांच्या दुर्मिळ अभंगांचा अमूल्य ठेवा असलेल्या ‘संत जगमित्रनागा अभंग गाथा’ या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने संपादक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांचा स्वागत व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक तथा ‘संत जगमित्र नागा चरित्र’ ग्रंथाचे लेखक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांनी संपादित केलेल्या या गाथेमध्ये संत जगमित्रनागा महाराजांचे दुर्मिळ अभंग संकलित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अभंगांसोबत त्यांचा सोपा व सुबोध भावार्थही देण्यात आल्याने हा ग्रंथ वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, संशोधक आणि संत साहित्यप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आर. आर. सूर्यवंशी, एस. आर. सूर्यवंशी, मठाधिपती श्री गिरी महाराज, मुळशी पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, माजी सरपंच चांगद...

MB NEWS-खा.डाॅ. प्रितम मुंडेंचा राजयोग प्रबळ : केंद्रीय मंत्रिमंडळात बीडला संधी मिळणार ? फेरबदलातील समावेशाची जोरदार चर्चा

 खा.डाॅ. प्रितम मुंडेंचा राजयोग प्रबळ : केंद्रीय मंत्रिमंडळात बीडला संधी मिळणार ? फेरबदलातील समावेशाची जोरदार चर्चा





नवी दिल्ली.......

     केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार आहे.या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. सध्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महिला खासदाराला मंत्रीपद देण्यास प्राधान्याने विचार सुरू असुन यात बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिल्लीतील सुत्रांनुसार समोर येत आहे.

       पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  यांच्यासोबत बैठक केली. तसंच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. दरम्यान या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतम मुंडे  यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर तसंच नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. 

       खा.डॉ. प्रीतम मुंडे या  बीडच्या खासदार आहेत.  दिवंगत लोकनेते  गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय कन्या आहेत. तसंच भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या लहान बहिण आहेत. खा.डाॅ. प्रितम मुंडे विक्रमादित्य खासदार म्हणून परिचित आहेत. यांनी 2014 ची लोकसभा पोटनिवडणूक लढवली. ही निवडणूक त्या तब्बल सहा लाख 96 हजार 321 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 1 लाख 68 हजार मतांच्या फरकानं पराभव केला होता.उच्चविद्याविभुषित, अभ्यासु , विविध प्रश्नांवर लोकसभेत आवाज उठवणे अशी त्यांची ओळख आहे.

टिप्पण्या

  1. ताई साहेब अभिनंदन
    विजयी भव ताई साहेब

    उत्तर द्याहटवा
  2. दबंग खासदार प्रीतम ताई साहेब अभिनंदन✌️✌️💯💯

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या