MB NEWS-यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख रेहान ठरला क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी

 यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख रेहान ठरला क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी



 परळी वैजनाथ

 नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा रेहान अजिमोद्दिन शेख या विद्यार्थ्यास क्रिकेट या खेळात क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली आहे.

 क्रिकेट या खेळामध्ये राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी मध्ये शिकत असलेला रेहान अजिमोद्दिन शेख हा विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे या विद्यार्थ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख मॅडम यांच्या हस्ते नुकताच  बीड या ठिकाणी धनादेश देण्यात आला.

क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी ठरलेला विद्यार्थी रेहान अजिमोद्दिन शेख याचे नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे , सहसचिव प्रदीप खाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा.अतुल दुबे,परळी तालुका क्रीडा समन्वयक संजय (पापा) देशमुख यांच्यासह परळी वैजनाथ  तालुक्यातील क्रीडा शिक्षक, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !