MB NEWS:भीम जयंतीनिमित्त भीमजन्मभूमी महू येथे अभिवादन करण्याचा आयुष्यातील सुवर्णक्षण - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

 भीम जयंतीनिमित्त भीमजन्मभूमी महू येथे अभिवादन करण्याचा आयुष्यातील सुवर्णक्षण - बाजीराव भैय्या धर्माधिकारी





 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       परळीचे माजी नगराध्यक्ष तथा परळीच्या भीम महोत्सवाचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी भीम जयंतीनिमित्त भीमजन्मभूमी महू येथे जाऊन अभिवादन केले.भीम जयंतीनिमित्त भीमजन्मभूमी महू येथे अभिवादन करण्याचा आयुष्यातील हा सुवर्णक्षण असल्याची भावना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

              

      विश्वभूषण,प्रज्ञासूर्य,युगनायक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू,मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधिल "भीमजन्मभूमी"  स्मारक येथे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी भीम जयंतीनिमित्त भीमरायास अभिवादन केले. दरवर्षी परळी येथे विविध ठिकाणी भीम जयंती साजरी करण्याचा योग असतो.मात्र यावर्षी काही अपरिहार्य कारणास्तव आज भीम जन्मोत्सवा निमित्त परळी मध्ये जयंती साजरी करता आली नाही.मात्र आज भीम जनमोत्सवानिमित्त परळी मध्ये जयंती साजरी करता आली नाही मात्र युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू,मध्यप्रदेश येथे जयंती साजरी करण्याचा एक अविस्मरणीय क्षण  प्राप्त झाला. आयुष्यातील एक सुवर्णक्षण मला अनुभवता आला अशी  भावना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

Advertise 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार