इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन

परळी ( प्रतिनिधी ) महामानव , भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी परळीत एक वही एक पेन या अभिनव अभियानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक पत्रकार विकास वाघमारे यांनी दिली आहे . 


शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . आणि ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही . असे डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . त्यामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळावी या हेतूने एक वही एक पेन हा उपक्रम १४ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी ९ ते १ या वेळेत राबविण्यात येणार आहे . अवांतर खर्च न करता या समाजोपयोगी अभियानात सहभागी होऊन या वेळेत आपण वही अथवा पेन आणून द्याव्यात . जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत . 


या वेळी या अभियानाचे संस्थापक विकास रोडे ही उपस्थित राहणार आहेत . तरी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन विकास वाघमारे यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी ९ ०२८३४७३५८ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा .




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या