दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता

 परळी नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता- प्रा. बी.जी. खाडे



परळीवैजनाथ:- परळी नगर परिषदेतील सेवा निवृत्त सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सातव्या वेतनाचा फरकाचा दुसरा हप्ता मिळणार आहे अशी माहिती नगरपरिषद, कर्मचारी व सेवानिवृत नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.


31 ऑक्टोबर रोजी परळी नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रा. बी. जी खाडे व उपाध्यक्ष शंकर साळवे यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी कांबळे यांना मागण्याचे निवेदन दिले. शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत दिवाळीसाठी नगरपरिषदेतील  सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता देण्याचे मान्य केले. सातव्या वेतनाचा पहीला व तिसरा हप्ता यापूर्वीच मिळालेला आहे. सेवानिवृत कर्मचा-यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष प्रा.बी जी.खाडे, सरचिटणीस जगन्नाथ शहाणे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकार्यास भेटून चर्चा केली. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता दिवाळीसाठी देण्याचे मान्य केले. तसेच सेवानिवृत कर्मचा-यांची थकीत रक्कम दरमहीन्यास सेवाज्येष्ठतेनुसार देण्याचे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....