राजपान फुलचंदराव कराड यांचे निधन

 भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांना पुत्रशोक 

राजपान फुलचंदराव कराड यांचे निधन

परळी (प्रतिनिधी) - श्री संत भगवान सेनेचे सरसेनापती भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांचे चिरंजीव राजपान फुलचंदराव कराड यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता निधन झाले


फुलचंदराव कराड यांचे राजपान कराड हे एकुलते एक चिरंजीव होते राजपान कराड हे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून पदवीधर होते. सध्या ते परळी तालुका दूध व्यवसायिक सहकारी संघाचे काम पाहत होते. मनमिळावू,सुस्वाभावी अत्यंत हुशार होते.अशी त्यांची सर्वत्र ख्याती होती.

आज मंगळवारी अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले.यामुळे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड व कराड कुटुंबीयाला मोठा धक्का बसला आहे.या निधनामुळे सहकारी मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.राजपान कराड यांच्या पक्षात आई-वडील, चार बहिणी,दोन मुली असा मोठा परिवार आहे .


राजपान कराड यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी मौजे लिंबुटा येथे बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे,असे शोकाकुल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार