इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

1 ते 15 जानेवारी दरम्यान लोकोत्सव ,जनसंपर्क अभियान राबवणार

 अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचे वैद्यनाथाच्या परळीत भाविकांकडून उत्साहात स्वागत


1 ते 15 जानेवारी दरम्यान लोकोत्सव ,जनसंपर्क अभियान राबवणार


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         येत्या 22 जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या अनुषंगाने देशभरात सर्वत्र आयोध्या येथील अभिमंत्रित करण्यात आलेल्या अक्षता कलशाचे आगमन शहरा शहरात होत आहे. आयोध्येतून देऊन आलेल्या अक्षता कलशाचे आज पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाची नगरी असलेल्या परळी वैजनाथ येथे आगमन झाले. 

         या निमित्ताने औद्योगिक वसाहत येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात  आलेल्या अक्षता कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे एक ते 15 जानेवारी या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले. श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना हा लोकोत्सव व्हावा व या प्रतिष्ठापनेच्या वेळी स्वागत समारंभ, विविध उपक्रम, शोभायात्रा आदी नियोजन करण्यात आले. या मेळाव्याला परळी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक सर्व शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट