प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बीड -परळी महामार्गावर अपघातात: दोन ठार

 बीड -परळी महामार्गावर अपघातात: दोन ठार



बीड, प्रतिनिधी

बीड परळी महामार्गावर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास उपळी येथून तरुणाने विषारी औषध प्राशन केले असता त्याला उपचारासाठी बीडकडे घेऊन जात असताना बीड कडून परळी महामार्गावर मैंदा पोखरी गावच्या नजीक ऊसाचे ट्रॅक्टर व स्विफ्ट डिझायर गाडीचा आपघात घडल्याची घटना पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे 

 या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने उपळी गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे सदरील अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर गाडी मधील 

मयत झालेल्या रत्नमाला केशव पवार मुलगा प्रदीप केशव पवार राहणार उपळी तालुका वडवणी आसे मयत झालेल्याची नावे असून इतर जखमींना पिपंळनेर पोलिस कर्मचारी बहिरवाळ यांनी बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे 

भाच्याला वाचवण्यासाठी घेऊन जाताना हा आपघात घडल्याची माहिती दिली आहे असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या