प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामाबाबत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामाबाबत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट




 बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भात आज खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री श्री.नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात भेट घेतली.


बीड आणि लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब या रस्त्याचे अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव पर्यंत चौपदरीकरण करण्यात यावे आणि सदरील कामाचा समावेश रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात करण्यात यावा अशी मागणी यावेळी गडकरी यांच्याकडे केली.


मंत्री महोदयांनी देखील या मागणीची दखल घेऊन सदरील कामाचा मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समावेश करण्याचा विश्वास दिला. दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा-पोहनेर या रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर दिल्याबद्दल यावेळी त्यांचे खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी आभार मानले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या