ग्रामीण पोलिसांची कारवाई: पाच हजाराची दारु जप्त

 ग्रामीण पोलिसांची कारवाई: पाच हजाराची दारु जप्त 



परळी (प्रतिनिधी)

 परळी ग्रामीण पोलिसांनी परळी-नंदागौळ व परळी- धर्मापुरी मार्गावरील ढाब्यावर छापा टाकत अवैधपणे विक्री करण्यात येत असलेली 5 हजार 160 रुपयांची देशी व विदेशी दारु जप्त केली.

 परळी तालुक्यात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत धाब्यावर अवैधपणे दारु विक्री होत असल्याची माहिती मिळताच पो.नि.हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जाधव,पोउपनी झाबरे,पोह. सुंदर केंद्रे,पोशी.आश्रुबा नागरगोजे,पोशी आडे यांनी परळी-नंदागौळ मार्गावरील  ढाब्यावर छापा टाकत देशी व विदेशी अशी 3920 रुपयांची तर परळी- धर्मापुरी मार्गावरील  ढाब्यावरुन 1260 रुपयांची दारु जप्त केली.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार