इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

ऊसतोड कामगार संघटनांच्या मांजरीतील बैठकीत झाला सर्वानुमते निर्णय

शरद पवार - पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय


साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांच्या मांजरीतील बैठकीत झाला सर्वानुमते निर्णय




पुणे ।दिनांक २७। 

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार  आहे. साखर संघ व ऊसतोड कामगार संघटनांच्या आज झालेल्या बैठकीत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.


    ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांची एक बैठक आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे झाली, ऊसतोड मजुरांच्या दरवाढीत आणि त्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यावर बैठकीत चर्चा झाली. कामगारांच्या मजूरीत २९ टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे तर ही दरवाढ ४० टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या, त्यामुळे आज यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.


*पवार- मुंडे घेणार दरवाढीचा निर्णय* 

-----------

 ऊसतोड मजूरांच्या दरवाढीबाबत बैठकीत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजाताई मुंडे यांच्या लवादाने घ्यावा यावर आजच्या  साखर संघ व ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं, त्यामुळे येत्या ५ जानेवारीपर्यंत पवार-मुंडे लवादाची बैठक होऊन त्यात ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.


      आज झालेल्या बैठकीत साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील, उपाध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, प्रकाश आवाडे, ज्येष्ठ  संचालक जयप्रकाश दांडेगावकर तर ऊसतोड कामगार संघटनांच्या वतीने आ. सुरेश धस, गोरक्ष रसाळ, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, डी एल कराड, गहिनीनाथ थोरवे, सुखदेव सानप, सुरेश वनवे, जीवन राठोड आदी उपस्थित होते. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या