इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

बालनाट्य स्पर्धेत 'एलियन्स द ग्रेट' नाटकाला पहिले पारितोषिक

 बालनाट्य स्पर्धेत 'एलियन्स द ग्रेट' नाटकाला पहिले पारितोषिक

 राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्विकारतांना परळी येथील एलियन्स द ग्रेट नाटकातील कलावंत.


 दोन वैयक्तिक बक्षिसे, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून महेश होनमाने यांचा सन्मान 


परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गटस्तरीय बालनाट्य स्पर्धेत परळी येथील 'एलियन्स द ग्रेट' नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

 कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लातूर येथे कामगार कल्याण भावनात बुधवारी (दि. २७ डिसेंबर-२३) बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ८ नाट्यप्रयोग सादर झाले. त्यात महेश होनमाने दिग्दर्शित 'एलियन्स द ग्रेट' नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. तर द्वितीय बे एक बे, तृतीय स्वच्छता या नाटकाला बक्षीसे मिळाली.

 एलियन्स द ग्रेट नाटकाच्या दिग्दर्शनासाठी महेश होनमाने यांचा प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले. तर विठ्ठल या भूमिकेसाठी राजवीर शिंदे यांना द्वितीय बक्षीस मिळाले. 

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय नाट्य परिषदेचे लातूर शाखा अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, नाट्यकर्मी डॉ. मुकुंद भिसे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, गुणवंत कामगार सुधीर मुंडे, संयोजक सलीम पठाण यांच्या हस्ते झाले. या बालनाटिकेत आयुष पिसे, आदिनाथ यादव, प्रतीक मुंडे, श्रुतिका सुरवसे, अक्षरा धर्माधिकारी, ओमसाई कापावार, श्रीकृष्ण भिसे, विक्रम सरवदे, शर्वरी कापावार, श्रीयांश सुळ, राजवीर शिंदे यांनी भूमिका केली. तर सहदिग्दर्शक शिरीष तीर्थकर, नेपथ्य दिनेश कदम, प्रकाश योजना गायत्री सिद्धेश्वर, संगीत सोनाली डोंगरे, रंगभूषा रोहिणी होनमाने, रंगमंच व्यवस्था प्रशांत पांडे, वेशभूषा संतोष कापावार यांनी केले.



● युट्यूबवर आवश्य पहा :














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या