शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

 शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा




बीड  (जिमाका)

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादनविकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत, शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

राज्याबाहेर अभ्यास दौरा राबविताना शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याच बरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचे राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

अभ्यास दौरा राबविताना भेटीच्या ठिकाणांमध्ये परराज्यातील कृषि विद्यापीठ, राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या खाजगी कंपन्या / सस्था, कृषि विज्ञान केंद्र, फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. शिवाय इतर महत्वाच्या बाबींचाही समावेश आहे.

अभ्यास दौऱ्याचा कालावधी हा अधिकतम ७ दिवसाचा राहील यामध्ये प्रवास खर्च, निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य इ. बाबीचा समावेश राहील. तसेच प्रति लाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थी शेतकऱ्याने स्वतः करावा लागेल. 

अभ्यास दौरा साठी फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इत्यादी बाबत इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात आपले अर्ज 31 डिसेंबर 2023 पर्यंत   सादर करावेत. असे जाहीर आवाहन श्री. बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


● युट्यूबवर आवश्य पहा :













\

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !