इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदवाढ


कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश


मुंबई दि.15 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज- दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.


सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच असून मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते. 

त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याचे मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत

00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या