इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

#mbnews# ✍️सुधीर सांगळे यांचा प्रासंगिक विशेष लेख>>>>>18 पगड जातींच्या गराड्यातला 'जगमित्र'...!

 18 पगड जातींच्या गराड्यातला 'जगमित्र'...!

ज-काल महाराष्ट्रात व विशेष करून आपल्या मराठवाड्यात माणसाचे नाव घ्यायच्या आधी त्याची जात माहित केली जाते. जातीजातींचे समीकरण इतके घन होत चालले आहे की एका ताटात जेवणाऱ्या दोन जातीतील मित्रांचा सुद्धा एकमेकांवर आता विश्वास उरला नाही. या सगळ्यांमध्ये मूळ आरक्षणाची मागणी बाजूला राहून आता जाती-जातीत संघर्ष पेटण्याची वेळ आली आहे. प्रत्येकालाच आपली स्वतःची जात प्रिय असते मात्र त्याचबरोबर दुसऱ्याच्या जातीचाही आदर - सन्मान करून एकमेकांमधील विश्वास टिकवता आला पाहिजे. 


सर्व जातींचा सन्मान आणि आपल्या अवतीभवती सन्मानाची जागा मिळवून देत या विश्वासाला आणि आपसातील बंधू भावाला धनंजय मुंडे या नेतृत्वाने कायमच प्राधान्य दिलेलं आहे.

मागे लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेकांची जात काढण्यात आली आणि कोणत्या जातीला जिल्ह्यात किती महत्त्व आहे यावरूनही रणकंदन झाले.  

धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव यांच्यापासून ते सुरक्षा रक्षक, केअर टेकर, वाहन चालक ते अगदी जेवण बनवणारे आमचे सय्यद मामा यांच्यापर्यंत सर्व जाती-धर्मातील सदस्य सावली सारखे सोबत असतात.

धनंजय मुंडे यांच्या पदाधिकारी व कारभारी मंडळींमध्ये त्याचबरोबर त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारात देखील सर्व जाती-धर्मातील प्रतिनिधी आढळून येतात. इतकेच नाही तर धनंजय मुंडे ज्या व्यक्तीला नगराध्यक्ष करण्यासाठी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून वेगळे झाले ते सुद्धा कुणी वंजारी नव्हते. अशी असंख्य नावे व उदाहरणे आहेत. धनंजय मुंडे यांच्या सोबतीने सावलीसारखे ही सर्व मंडळी खांद्याला खांदा लावून प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक लढाईत सोबत असतात. धनंजय मुंडे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आली तेव्हा आणि पक्ष आपल्या या सर्व शिलेदारांना बरोबरीने सत्तेचा वाटा देऊन सोशल इंजिनिअरिंग साधलेली आहे. म्हणूनच परळी मतदारसंघ एकीने आपल्या नेक लेकाला कायम साथ देत आला आहे.

Click:✍️ मोहन साखरे यांचा लेख>>> ■ *धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले 'कृषीमुलक' कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे

      आपलं घर, घरातल्या किचनपासून जाती मुक्त ठेवणारा व सर्वधर्मसमभाव जपणारा हा माणूस जातीयवादी कसा असू शकतो?ज्या माणसाने कधी निधी वाटपात, कुठल्याही शासकीय संस्थेत पद देताना किंवा पक्षाचे पद देताना जात नाही तर काम पाहिले, याची साक्ष कितीतरी जण उघडपणे देतील! त्या कोविडच्या काळात आठवा कुणाची जात पाहिली मदत करताना?


सर्वांना बरोबरीने समान संधी निर्माण करून देणारे असे लोकनेतृत्व नशिबाने व दीर्घ काळाने लाभते. खरंतर अशा नेतृत्वाची उंची आपण आपले पाठबळ सर्वशक्तीने पाठीशी उभे करून दाखवायची हीच ती वेळ असावी. समस्त परळी मतदारसंघ आणि बीड जिल्हा आगामी काळात ते दाखवून देईल असा विश्वास वाटतो. 


लोकनेतृत्वाकडे आशा अपेक्षा सर्वांच्या असतात. त्या वेळोवेळी पूर्णही होत असतात. खरी गरज असते माणसातला 'जगमित्र' ओळखून त्यांच्या सोबतीला आपण आपला विश्वास आणि आपली निष्ठा कायम अबाधित ठेवण्याची. आगामी काळात सर्वजण मिळून ते सिद्ध करतीलच! शेवटी कसंय ना, नेते अनेक असतात, निवडणूका अनेक असतात, पण सर्वांना सोबत घेऊन चालणारा, अठरा पगड जातींच्या गराड्यात सर्वांना प्रगतीसाठी झटणारा 'जगमित्र' कोत्यावधी लोकांमध्ये एकच असतो!

Click:✍️ _प्रशांत भा.जोशी यांचा विशेष लेख_ >>>>>>>>>>>> ■ *धनंजय मुंडे : शेतकऱ्यांच्या विकासाचे मंत्री नव्हे मंत्र!*


उच्च विचारसरणी, मनात कायम आपल्या मातीशी व मातीतील माणसाशी इमान आणि कितीही मोठ्या पदावर असले तरी पाय जमिनीवर... अशा मोठ्या मनाच्या राजा माणसाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! 

        ✍️ सुधीर सांगळे

-----------------------------------

----------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या