आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जयहिंद सामाजिक प्रतिष्ठान विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करणार- संतोष मुंडे
परळी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळेमध्ये हा वह्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उपयुक्त असे साहित्य वाटप करून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
-----------------------------------------------
Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_
Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_
Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा