प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-गरजूंनी लाभ घ्यावा आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाचे आवाहन

 उपमुख्यमंत्री अजित पवार व‌ आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन - डॉ.राजेश इंगोले

गरजूंनी लाभ घ्यावा आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाचे आवाहन

====================

अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी दिली आहे. तर आरोग्य तपासणी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 


शहरातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांच्या समाधान मानसोपचार रूग्णालय व व्यसनमुक्ती केंद्र व नेत्रालय, हाऊसिंग सोसायटी, पंचायत समिती जवळ, अंबाजोगाई या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भव्य मोफत व्यसनमुक्ती शिबीर, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबीर, मतिमंदत्व तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर, पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १५ जुलै रोजी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे. २२ जुलै रोजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भव्य मोफत व्यसनमुक्ती शिबीर, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबीर, मतिमंदत्व तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर, पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी दिली आहे. तर आरोग्य तपासणी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील शिबिरात तपासणी करीता नांवनोंदणी करणे आवश्यक आहे. तरी पुर्व नांवनोंदणी करण्यासाठी तसेच ज्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. अशा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी पुढील मोबाईल (नंबर - 9529893030) संपर्क साधावा असे आवाहन आयोजक राजकिशोर पापा मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

=======================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या