इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

आजारास कंटाळून आडत व्यापाऱ्याने केली गळफास घेऊन आत्महत्या 


केज :- केज येथे एका ६२ वर्ष वयाच्या आडत व्यापाऱ्याने आजारास कंटाळून घराच्या तळमजल्यात लोखंडी आडूला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

केज शहरातील नवामोंढा परिसरात प्रसिद्ध आडत व्यापारी राधेशाम श्रीराम तोष्णीवाल (वय ६२) यांची आडत व त्याठिकाणी राहते घर आहे. ते मागील काही दिवसापासून आजारी होते. आजारास कंटाळून राधेश्याम तोष्णिवाल यांनी टोकाची भूमिका घेत दि. १९ सप्टेंबर शुक्रवारी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास घराच्या तळमजल्यात लोखंडी आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, जमादार दत्तात्रय बिक्कड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात जमादार दत्तात्रय बिक्कड हे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या