इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

श्रीकांत करमाळकर यांना मातृशोक; श्रीमती सुशीलाबाई करमाळकर यांचे निधन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक श्रीकांत करमाळकर यांच्या मातोश्री व प्रसन्न  सतिश करमाळकर यांच्या आजी श्रीमती सुशिलाबाई विष्णुपंत  करमाळकर यांचे आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाल.  मृत्यूसमयी त्या 90 वर्षे वयाच्या होत्य. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.

   श्रीमती सुशिलाबाई विष्णुपंत करमाळकर या अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ, धार्मिक वृत्तीच्या होत्या. करमाळकर कुटुंबाचा आधारवड म्हणून त्यांची ओळख होती. सर्व नातलग, परिचित व मित्रपरिवारांमध्ये त्या 'आई' म्हणूनच परिचित होत्या. परळीच्या व्यापारपेठेत करमाळकर कुटुंबाने एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून नावलौकिक केला,  या पाठीमागे ही आपल्या मुलांना व्यवहारात अतिशय जडणघडण करून कौटुंबिक मनोबल देण्याचे काम सातत्याने दिवंगत सुशिलाबाई यांनी केलेले आहे. विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. यांच्या निधनाने करमाळकर कुटुंबाचा एक आधारवड कोसळला आहे. त्यांच्या निधनाने करमाळकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. 

आज अंत्यसंस्कार..

     दिवंगत सुशिलाबाई करमाळकर यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे आज मंगळवार दिनांक 23 रोजी सकाळी नऊ वाजता मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  पद्मावती गल्ली येथील करमाळकर यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या