इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार -माधव मुंडे

 गावच्या विकासाला खीळ : मनमानी कारभाराला कंटाळून हाळमच्या उपसरपंचाचा राजीनामा




सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार  -माधव मुंडे

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी):     

        लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येताना गावकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात होत असलेल्या अनियमिततेवर संताप व्यक्त करत, परळी तालुक्यातील हाळमच्या उपसरपंचाने थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवनाथ सुखदेव दहिफळे असे या उपसरपंचाचे नाव असून, त्यांनी आपला राजीनामा गट विकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.     


     परळी तालुक्यातील हाळमचे उपसरपंच देवनाथ सुखदेव दहिफळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात ग्रामसभाच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय नसणे, मासिक बैठकांचा अभाव, पथदिव्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न यांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ मूलभूत सुविधाच नव्हे, तर महसुली कामांतही मोठा गोंधळ असल्याचा आरोप दहिफळे यांनी केला आहे. गावठाण जमिनीवर चुकीची अतिक्रमणे होणे, पीटीआर रजिस्टरमध्ये चुकीच्या नोंदी करणे आणि ग्रामसेवकांनी वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब न देणे अशा गंभीर बाबी त्यांनी उघड केल्या आहेत. 

      "सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे मी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे मी पदावर राहण्यास इच्छुक नाही," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या राजीनाम्याच्या प्रती जिल्हाधिकारी (बीड), उपजिल्हाधिकारी (अंबाजोगाई) आणि तहसीलदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी गावातील जेष्ठ नेतेसर्वश्री अंगदराव दहीफळे , माजी सरपंच पांडुरंग दहिफळे, अरुण दहिफळे माजी चेअरमन,सिद्धेश्वर मधुकर गुट्टे,रवींद्र मुंडे,नाथराव गुट्टे, जनार्धन दहिफळे,मंचक गुट्टे, लिंबाजी दहिफळे, मधुकर दहिफळे, हरिश्चंद्र महाराज गुट्टे,पंढरी गित्ते, पंडित दहिफळे,ज्ञानोबा पेंटूळे,, धनराज मुंडे आदीजन उपस्थित होते

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार- माधव मुंडे

 या राजीनामा च्या वेळी युवा नेते माधव मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना असे सांगितले की सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा उन्माद वाढला आहे.गावातील लोकांवर अन्यायाची परिसीमा गाठली आहे. या सत्ताधाऱ्यांना गावातील प्रत्येक नागरिक वैतागून गेला असून गावाला यांच्या जाचातून मुक्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.अशी प्रतिक्रिया युवा नेते माधव मुंडे यांनी यावेळी दिली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट