इमेज
१६ वर्षीय मुलीवर दोघांकडून पाशवी अत्याचार; आरोपीं विरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        परळी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील धारावती तांडा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. *बहाण्याने बोलावून केला अत्याचार*         मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला एका बहाण्याने घरात बोलावून घेतले. मुलगी घरात येताच नराधमांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी पीडितेला दिली. *गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू        घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोप...

परळीकरांचा बहुमान वाढवला...... मैथिली चे सर्व स्तरातून अभिनंदन

 परळीच्या लेकीचा कलाविष्कार पाहून पुणेकर रसिक भारावले : मैथिली लोंढे यांना पुण्यात 'ललना कलारत्न पुरस्कार' प्रदान



परळी वैजनाथ/ प्रतिनिधी.....

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्याच्या निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात परळीची युवा कलाकार मैथिली बाळकृष्ण लोंढे हिला मानाचा 'ललना कलारत्न पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले.

पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर येथे महिला कलाकारांसाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात मैथिलीच्या कलागुणांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते मैथिलीने स्टेजवर सादर केलेले थेट चित्रकला प्रात्यक्षिक अत्यंत कमी वेळात तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्याची खाण 'मधुबाला' यांचे हुबेहूब चित्र कॅनव्हासवर साकारले. परळीच्या या लेकीचा कलाविष्कार पाहून उपस्थित पुणेकर रसिक आणि मान्यवर भारावून गेले. टाळ्यांच्या कडकडाटात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना मैथिली म्हणाली की, "निवेदिता प्रतिष्ठानसारख्या संस्थेकडून कलेची पोचपावती मिळणे ही माझ्यासाठी आणि माझ्या परळी शहरासाठी अभिमानाची बाब आहे." या यशामुळे मैथिलीवर परळी वैजनाथ व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!