आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...

सर्व नवनिर्वाचित सरपंच जगमित्र कार्यालयात दाखल

 परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. धनंजय मुंडेंचे एकहाती वर्चस्व!

सिरसाळा पुन्हा ताब्यात, तर जळगव्हाण आणि मरळवाडी सहज राखली

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवत तीनही ग्रामपंचायती वरती धनंजय मुंडे यांचे एकेरी वर्चस्व सिद्ध केले आहे.

या पोटनिवडणुकीत परळी तालुक्यातील सिरसाळा या मोठ्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेख नसीब यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून विजयानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या समवेत आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात जाऊन स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला. यावेळी सिरसाळा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच शेख नसीब शेख रहीम, माजी सरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख नय्युम, शेख रफिक, अक्रम पठाण, सलमान पठाण, माजी सरपंच इम्रान पठाण, उपसरपंच सुलतान पठाण, मोहम्मद इनामदार, गुड्डू पठाण, मुस्लिम संघाचे जिल्हाध्यक्ष शिराज देशमुख, सिरसाळा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन नदीम भाई, जावेद पत्रकार, अशोक गलांडे, तंटामुक्त अध्यक्ष गाव समिती सिरसाळा अयोसोद्दीन इनामदार, विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष शेख राजू, इरफान बॉस, रफिक बागवान आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर जळगव्हाण येथील नवनिर्वाचित सरपंच संदीप वसंतराव चव्हाण यांसह राजाभाऊ सपकाळ, सुभाष जाधव, अमोल जाधव, उद्धवराव जाधव, कैलास क्षीरसागर, प्रल्हाद पंडित, शिवाजी राठोड, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश चव्हाण, रामजी चव्हाण, लक्ष्मण राठोड, विश्वनाथ आडे, उद्धव सोळंके यांसह आदी उपस्थित होते.

मरळवाडी चे मयत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी व नवनिर्वाचित सरपंच श्रीमती दीपाली बापुराव आंधळे यांच्या सह उपसरपंच वाल्मीक आघाव, चेअरमन हनुमान आंधळे, त्र्यंबक फड, विष्णू आंधळे, बाळासाहेब फड, संतराम आंधळे, परमेश्वर फड, बापुराव फड, अश्रूबा आघाव, तुकाराम व्हावळे, शिवाजी फड यांसह पदाधिकारी आदींनी जगमित्र कार्यालयात उपस्थित राहून विजयाचा जल्लोष साजरा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....