संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले-अभयकुमार ठक्कर



परळी वैजनाथ / प्रतिनिधी

परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आज संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुटे, डॉ.  दिनेश कुरमे  तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, ग्रामविकास आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज असून समाजाने त्यांच्या आदर्शांचे पालन करून एक सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण करावा.

तसेच त्यांनी सांगितले की, संत तुकडोजी महाराजांचे कार्य केवळ अध्यात्मिक नसून सामाजिक परिवर्तन घडविणारे होते. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी अभिवादन ठरेल असे श्री ठक्कर म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!