आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...

बीड जिल्हातील केज येथील केंद्राचा समावेश

 महा डायलिसीस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण



किडनी विकारग्रस्तांना दिलासा

मुंबई, दि २९ : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या "महाडायलिसीस" योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  ‘महाडायलिसीस’ योजना सध्या विविध शासकीय रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड्स, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यात ९२ महाडायलिसीस केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये ५५८ डायलिसिस बेड्स उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र दिनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १२ नवीन केंद्रांचे लोकार्पण होणार असून, त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार आहे. या नव्या केंद्रांमध्ये दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोकार्पण होणाऱ्या केंद्रांमध्ये मुरगुड (जि. कोल्हापूर), मूल (जि. चंद्रपूर), दारव्हा (जि. यवतमाळ), केज (जि. बीड), इगतपुरी (जि. नाशिक), रावेर (जि. जळगाव), मंगळवेढा (जि. सोलापूर), ढेबेवाडी (जि. सातारा), वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग), कुरखेडा (जि. गडचिरोली), दापोली (जि. रत्नागिरी) आणि बदलापूर (जि. ठाणे) येथील रुग्णालयांचा समावेश आहे.

‘महाडायलिसीस’ योजना एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, http://mahadialysis.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे माहिती व सेवा उपलब्ध आहेत. रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे.

या केंद्रांमध्ये प्रशिक्षित डायलिसीस तंत्रज्ञ, नर्सेस व सहाय्यक कर्मचारी कार्यरत असून, नेफ्रोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जात आहेत. स्वच्छता, सुरक्षितता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन केले जात आहे. तसेच रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला यांसारख्या सेवा रुग्णांना पूर्णतः मोफत दिल्या जातात.

ही योजना केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या संस्थेमार्फत राबवली जात असून, सर्व केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे.

‘महाडायलिसीस’ योजनेमुळे खासगी उपचारांवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार व मोफत सेवा उपलब्ध झाल्याने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे.


00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....